Home भंडारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार समारोह व विशेष बैठकीचे...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार समारोह व विशेष बैठकीचे आयोजन

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20240111_072843.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार समारोह व विशेष बैठकीचे आयोजन

सतीश पारधी यांची गोंदिया जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती

गोंदिया( संजीव भांबोरे) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांच्या मार्गदर्शनानुसार व राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांच्या सूचनेनुसार गोंदिया जिल्ह्याच्या वतीने विश्राम भवन येथे विशेष बैठकीचे आयोजन करून त्या बैठकीमध्ये सत्कार सोहळ्याचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. या बैठकीमध्ये गोंदिया जिल्ह्यातील डिजिटल मीडिया चे ज्येष्ठ पत्रकार तथा नवराष्ट्रचे प्रतिनिधी सतीश पारधी यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गोंदिया येथील सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र भांडारकर यांच्या शाल .श्रीफळ .पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ या संघाचे पदाधिकारी व त्यांचे सहयोगी यांनी सांगितले की पत्रकार डिजिटल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया कोणत्याही माध्यमाचा असला तरी आपली बातमी प्रकाशित करीत असतात .अशा निर्भीड पत्रकारांना धमकी येत असतात त्यामुळे पत्रकारांना पोलीस संरक्षण ,मानधन, इन्शुरन्स पत्रकारांना अधिस्वीकृती दर्जा ,आरोग्य सुविधा, विविध शासकीय समित्यावर ग्रामीण स्तरापासून राज्यस्तरावर अशासकीय सदस्य म्हणून पत्रकारांचे नियुक्ती नियुक्ती करण्यात यावे .असे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व या संबंधात लवकरच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले .या बैठकीत सर्वानुमते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या गोंदिया जिल्हाध्यक्षपदी सतीश पारधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोंदिया जिल्हा युवक उपाध्यक्षपदी सचिन बनसोड ,तथा गोंदिया तालुकाध्यक्षपदी मोहन तवाडे व आमगाव तालुका अध्यक्षपदी सरोज कावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष भार्गव वाघमारे ,जिल्हा उपाध्यक्ष नरेश बोपचे ,जिल्हा युवक अध्यक्ष देवेंद्र दमाहे ,सचिन बनसोड सरोज कावळे, मोहन तवाडे, नितेश आगासे, दिलीप चव्हाण ,सुरेश साठवणे व इतर पत्रकार उपस्थित होते.

Previous articleमोठी बातमी : पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर; राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता!!
Next articleअड्याळ येथील फुलचंद नंदनवार तरुणाने सिलिंग फॅनला नायलान दोरीने गळफास लावून केली आत्महत्या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here