Home भंडारा सनराईज कंप्युटर पहेलाकडून विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे व सिक्युरिटी विषयी कार्यशाळा संपन्न

सनराईज कंप्युटर पहेलाकडून विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे व सिक्युरिटी विषयी कार्यशाळा संपन्न

29
0

आशाताई बच्छाव

IMG_20231230_115159.jpg

सनराईज कंप्युटर पहेलाकडून विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे व सिक्युरिटी विषयी कार्यशाळा संपन्न

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) भंडारा तालुक्यातील पहेला येथिल सनराईज कॉम्पुटर इन्स्टिटयूट च्या माध्यमातून दिनांक 28 डिसेंबर 2023 ला आदिवासी शिव विद्यालय मिनसी, गांधी विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालय पहेला आणि आदर्श विद्यालय दवडीपार बाजार या ठिकाणी इय्यता नववी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबरसुरक्षा जागरूकता प्रशिक्षण हि मोहीम राबविण्यात आली. त्याकरिता विद्यार्थ्यांनी सायबर हल्ले, डेटा हॅक आणि फिशिंग अ‍ॅक्टिव्हिटी यांसारख्या धोका कसा ओळखाचा, जोखीम पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी प्रोटोकॉलसह, घटनेचा अहवाल देणे आणि समस्येचे निराकरण करणे याविषयीची माहिती देण्यात आली.
एमकेसीएल व एलएलसी भंडारा चे विपणन सल्लागार सबिहा अन्सारी तसेच निकिता तोरणकर मॅडम यांनी प्रोजेक्टरवर प्रेझेटेंशन व व्हिडीओ द्वारे सायबर गुन्हे कसे घडतात त्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच याप्रकारच्या गुन्हांपासून आपला बचाव कसा होऊ शकतो हे सुद्धा सांगितले. सनराईज कॉम्पुटर चे संचालक विलास बांडेबुचे यांनी आपल्या परिसरात नुकतेच यामुळे घडलेल्या घटनेचा देऊन निराकरण केले.
कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी शिव विद्यालय मिन्सि त्यानंतर गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय पहेला आणि दुपार नंतर आदर्श विद्यालय दवडीपार बाजार येथे करण्यात आले. यावेळी जवळजवळ पाचशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदिवासी शिव विद्यालयाचे मुख्याधापक एस. टी. गभणे सर, गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वाय. एन. काटेखाये , आदर्श विद्यालयाचे मुख्याधापक एम. एस. लांजेवार , प्रा. विनोद हटवार प्रा. सुरज गोंडाणे , प्रा. शरद भुरे, लीलाधर कुंभलकर, प्रभाकर हटवार , धनराज भोयर , लीला परशुरामकर, एस डी गावंडे , एस डब्लू किरणापुरे, कु. पी. एम गोस्वामी यांनी सहकार्य केले. तसेच सनराईज कंप्युटर चे प्रशिक्षक कु. तुप्ती मते, आचल आजबले आणि गंगाधर नागपुरे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleतडस च्या हल्ल्यात चार शेळ्या ठार,
Next articleविद्यार्थी आणि गावकरी जीव मुठीत घेऊन ओलांडतात महामार्ग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here