Home अमरावती भरती प्रक्रिया राबविणार्‍या खाजगी कंपन्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर शासनाविरोधात फलकबाजी व घोषणा...

भरती प्रक्रिया राबविणार्‍या खाजगी कंपन्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर शासनाविरोधात फलकबाजी व घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा. ————

33
0

आशाताई बच्छाव

IMG_20240113_191637.jpg

भरती प्रक्रिया राबविणार्‍या खाजगी कंपन्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर शासनाविरोधात फलकबाजी व घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयवर मोर्चा.
————
दैनिक युवा मराठा.
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
देशात शासकीय नोकरी भरती राबणाऱ्या खाजगी कंपन्या बंद करा या मागणीसाठी शुक्रवारी शेकडो विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी शासनाच्या धोरणाचा निषेध केला. गर्ल्स हायस्कूल चौकातून या विद्यार्थ्यांनी डॉ. अजय यावले यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. त्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. टीसीएस आणि आयबीपीएस या खाजगी कंपन्या बंद करा, तलाठी भरती चा निकाल रद्द करून तलाठी भरती ही ऑफलाइन पद्धतीने पुन्हा घेण्यात यावी. पोलीस भरती आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी पूर्ण करून विद्यार्थ्यांना रुजू करून घ्यावे. परीक्षा शुल्क हे केवळ तीनशे रुपयांच्या आताच ठेवा. ज्या लोकांनी या टीसीएस आणि आयबीपीएस मध्ये घोळ केला, त्या लोकांवर कारवाई करावी आधी मागण्याकरिता स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणारे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. गर्ल्स हायस्कूल चौकातून डॉ. अजय यावले यांच्या नेतृत्वा मोर्चाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शासनाविरोधात फलकबाजी व घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी आंदोलकांची भेट घेत आपला पाठिंबा दर्शविला. तसेच या मोर्चाला संबोधित केले. विद्यार्थ्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास२५ जानेवारीपासून जिल्ह्यातील एक हजार विद्यार्थ्यांना घेऊन उपोषण करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here