Home भंडारा विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पवनी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन संपन्न

विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पवनी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन संपन्न

34
0

आशाताई बच्छाव

IMG_20231224_060505.jpg

विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पवनी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन संपन्न

शासनाचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधले

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) विदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर विविध मागण्याकरिता 22 डिसेंबर 2023 ला धरणे आंदोलन करण्यात आले .या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला शेतकरी संघटनेचे नेते सदानंद धारगावे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे पवनी तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री, व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले .देण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये इंदिरा सागर गोसे प्रकल्पाच्या सुरक्षा पार तात्काळ करण्यात यावे ,शेतकरी ,शेतमजूर श्रावणबाळ ,वृद्ध विधवा महिला, दिव्यांग ,निराधार यांना सन 1994 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान सन्मान पेन्शन योजनेअंतर्गत ६ हजार रुपये महिना देण्यात यावा, शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी ,धानाला 1000 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्यात यावा, सन २००६ लापारित झालेल्या स्वामीनातन आयोग तात्काल लागू करण्यात यावा, धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे ,शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणाकरता 25 टक्के आरक्षण देण्यात यावे ,शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात यावे, भूमीहिन लोकांना घरांचे पट्टे देण्यात यावे ,व त्यांना जागा उपलब्ध करून घरकुल देण्यात यावे ,शेतकरी ,शेतमजूर ,श्रावण बाळ व वृद्ध यांना वयाची अट 65 वर्ष ऐवजी 60 वर्ष करण्यात यावे ,विधवा महिलांची चालू पेन्शन बंद करू नये, गॅस सिलेंडर 300 रुपये देण्यात यावे ,पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्यात यावे ,शेतकऱ्यांना बी बियाणे औषधी 50% सबसिडी देण्यात यावी ,अवकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहेत तरी त्यांना एकरी पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात यावे ,रास्त भाव दुकानात जीवनाशक वस्तूंचे अल्प किमतीत वितरण करण्यात यावे, सरकारी रास्त भाव दुकानदारांना कमिशन ऐवजी मानधन देण्यात यावा ,ज्यांच्याकडे केरोसीन परवाने होते आणि केरोसीन बंद झाले असे केरोसीन धारकांना गॅस सिलेंडरचे परवाने देण्यात यावे ,वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले .निवेदन देताना उपाध्यक्ष नम्रताताई बागडे ,मीनाताई धारगावे अरविंद धारगावे, हर्षल वाघमारे, वसंता देशमुख ,वसंत चुटे, कामना मोहरकर, शोभा शेंडे ,छाया शेंडे भाग्रता हुकरे ,सुमन मडावी, मीरा वरंबे, मंदा भेंडारकर, सुनील चिचमलकर मनोहर ढोमणे ,कुसुम बावनकर, वैशाली भिवगडे कृष्णा भुरे ,फत्तु वाघमारे श्रीराम बाराई ,श्रीराम मेश्राम ,निरज तलमले रंजना तलमले यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here