आशाताई बच्छाव
मुलाच्या मृत्यूस जबाबदार असणार्या त्या पाच जणांविरुध्द कारवाई करुन न्याय देण्याची कुटुंबियांची मागणी
सदर बाजार पोलीस चोर सोडून संन्याशाला फाशी देत आहेत, त्यांच्याकडून तपास काढून तो एलसीबीकडे सोपवा-कैलास भोपळे
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करणार्या कुणाल रावणगावकर, सागर दहिवाळ, पवन भुरेवाल, उत्कर्ष बीडकर, आणि आत्माराम शिंदे यांच्याविरुध्द कठोर कारवाई करुन न्याय देण्याची मागणी आज येथे एका पत्रकार परिषदेत भोपळे कुटुंबियांनी केली. दरम्यान, सदर बाजार पोलीस केवळ झुलवत ठेवत असून त्यांची भुमिका ही चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याची असल्याने त्यांच्याकडून तपास काढून तो एलसीबीकडे वर्ग करण्याची मागणीही कैलास भोपळे यांनी केली आहे.
या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देतांना भोपळे कुटुंबियांनी सांगितले की, शुभम कैलास भोपळे रा. सुवर्णकार नगर याने वरील पाच लोकांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याचा मृत्यूपूर्व जबाब आणि पोलीसांची दुटप्पी भूमिका याबद्दल आपल्या कुटुंबियांना संशय आहे. कुणाल रावणगावकर, सागर दहिवाळ, पवन भुरेवाल, उत्कर्ष बीडकर, आणि आत्माराम शिंदे या सर्व पाच जणांनी मिळून आपल्या मुलाचा प्रचंड छळ केला आहे. पैशासाठी त्याची स्कुटी हिरावून घेतली. त्याला वेळोवेळी जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत होत्या. आपला मुलगा शुभम हा मजुरीचे काम करत होता. त्याच्याकडे एवढे पैसे कुठून येणार? तरीपण आपण त्यास मदत केली. वरील आरोपींचे पैसे दिल्यानंतरही ते सर्वच जण पैशासाठी शुभमचा वेळोवेळी छळ करत होते. कुणाल रावणगावर, सागर दहीवाळ व पवन मन्नासिंग भुरेवाल याच्याकडुन सहा महिन्यापुर्वी वीस हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर दोन महिन्याने त्यांनी पैशाच






