Home सामाजिक गुरू आणि शिष्य

गुरू आणि शिष्य

104
0

आशाताई बच्छाव

IMG_20240225_072850.jpg

गुरू आणि शिष्य

आपल्या हिंदू संस्कृतीत गुरूला खूप महत्त्व आहे.ज्यावेळी गुरूकुल पध्दती अस्तित्वात होती त्यावेळी शिष्य आपल्या गुरूला गुरूदक्षिणा देत असे.गुरूदक्षिणा काय असावी हे सर्वस्वी गुरूच ठरवत असे.शिष्यही आनंदाने आपल्या गुरूला तेच देत असे जे गुरूने मागितले असायचे.गुरूची आज्ञा मानून तिचे पालन करणे हेच शिष्य आपले कर्तव्य मानत असे.गुरूदक्षिणा गुरूप्रती आदर व्यक्त करण्याची एक पद्धत होती.गुरू शिष्यांकडून तेव्हाच गुरूदक्षिणा घेत असे जेव्हा गुरूकडील सर्व ज्ञान शिष्य आत्मसात करीत असे.एकलव्य गुरू द्रोणाचार्यांना आपले गुरू मानून त्यांच्या मूर्तीसमोर धनुर्विद्या शिकला.जेव्हा द्रोणाचार्यांनी त्याला विचारले की इतकी छान धनुर्विद्या तू कुठून शिकला? तुझे गुरू कोण? तेव्हा एकलव्याने द्रोणाचार्यांना उत्तर दिले -आपणच माझे गुरू आहात.तेव्हा द्रोणाचार्य त्याला म्हणाले -जर तू मला गुरू मानतो तर तुला मला गुरूदक्षिणा द्यावी लागेल.यावर एकलव्य म्हणतो – मी आपल्याला गुरूदक्षिणा द्यायला तयार आहे.तेव्हा गुरू द्रोणाचार्य एकलव्यला त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागतात.एकलव्य अगदी आनंदाने आपला अंगठा कापून गुरूचरणी अर्पण करतो.
शिष्याच्या ज्ञानात भर घालण्याचे मोलाचे कार्य शिक्षक करत असतो.गुरू आपले जीवन शिष्यांना घडविण्यासाठी वेचतात.जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरू असणे गरजेचे आहे.गुरू आपल्या शिष्यांना अंधाराकडून उजेडाकडे घेऊन जातो.त्याचे ज्ञान वाढवतो.गुरूविना माणसाचे जीवन अंधकारमय आहे.गुरू शिष्याचा चांगला मार्गदर्शक असतो.गुरू म्हणजे योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती.मग ती कुणीही असू शकते.जीवनातील सर्वात पहिली गुरू म्हणजे आई.ती आपल्यावर लहानपणापासून संस्कार करते.काय योग्य आणि काय अयोग्य याची जाणीव सर्वात पहिले आईच करून देते.
गुरू आपल्या शिष्यांना नेहमीच योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करतात.जीवनातील अडचणींचा सामना करत कसे ध्येय गाठायचे याचे शिक्षणही गुरू आपल्या शिष्यांना देत असतात.आज ब-याच प्रमाणात गुरू-शिष्य परंपरेत खूप बदल झालेला आहे.पण गुरूचे कार्य आजही शिष्याचा विकास घडवणे हेच असते.गुरूचे काम ज्ञान देणे आणि शिष्याचे काम ज्ञान आत्मसात करण्याचे आहे.गुरू-शिष्यात जेव्हा समर्पण भाव असतो तेव्हाच शिष्य आपली उद्दिष्टे साध्य करू शकतो.एक गुरू आपल्या शिष्यांना नेहमीच चांगल्या वाईटातील फरक समजावून सांगत असतो.गुरू म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर.गुरूला आपल्याकडे परब्रह्म संबोधले जाते.पण हल्ली काही ठिकाणी ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसते.हल्ली ब-याच प्रमाणात गुरू -शिष्य यांच्यात औपचारिक संबंध राहिलेले आहेत.हल्लीचे शिष्य आपल्या गुरूंचा सन्मान करीत नाही असेही चित्र दिसून येते.अध्यापन करणे केवळ व्यवसायाचा भाग झाला आहे.पूर्वीसारखी आदर, श्रध्दा या भावनिक नात्यांना गुरू -शिष्यात स्थान राहिले नाही.काही अपवाद वगळता विद्यार्थ्यांना आपल्या गुरूबद्दल ना आदर आहे ना शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम घडविण्याची तळमळ उरली आहे.सर्वत्र शिक्षणाचा बाजार झाला आहे.हे चित्र नक्कीच सकारात्मक नाही.विद्यार्थ्यांकडून फी घेणे आणि त्याबद्दल त्यांना शिकवणे, एवढीच भूमिका आता शिक्षकांची असते.गुरू-शिष्य यांच्यात भावनिक संबंध न राहिल्यामुळे शिक्षण पध्दतीवर याचा नक्कीच परिणाम झाला आहे.आपल्या जीवनात आपण गुरूंना वंदनीय मानतो.जीवनात ज्या-ज्या व्यक्तींकडून ज्ञान प्राप्त होत असते ते सर्व आपले गुरू असतात.ती व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा मोठी असू शकते.गुरूने दिलेले अनुभव शिष्यांना जीवनात पुढे जाताना उपयोगी पडतात.शिष्याला मार्गदर्शन करून त्याला सामर्थ्याने उभे करण्याचे काम फक्त शिक्षकच करू शकतो.गुरूची महिमा अगाध आहे.गुरू आपल्याकडील ज्ञान शिष्यापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करीत असतो.
आज माॅडर्न टेक्नॉलॉजीने ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या आहेत.यामुळे गुरूचे महत्त्व कमी झाले असे अजिबात नाही.तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळालेले ज्ञान जरी आपली बौद्धिक पातळी वाढवत असले तरी गुरूकडून मिळणा-या ज्ञानाची बरोबरी कुणीही करू शकत नाही.म्हणजेच काय,जीवनाचा उध्दार करण्याचे काम गुरूद्वारा केले जाते हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleमुलाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या त्या पाच जणांविरुध्द कारवाई करुन न्याय देण्याची कुटुंबियांची मागणी
Next articleस्वातंत्र्यवीर वि दा सावरकर पुण्यतिथी विशेष — निधन नव्हे तर आत्मार्पण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here