Home गडचिरोली विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा बसस्थानक परिसरातील बोर्ड ग्रामपंचायत ने काढला...

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा बसस्थानक परिसरातील बोर्ड ग्रामपंचायत ने काढला नवरगाव येथील दोनशे कुटुंब बौद्ध बांधवांनी जातीवादी लोकांच्या जाचाला कंटाळून सोडले गाव

171
0

आशाताई बच्छाव

IMG_20231223_114812.jpg

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचा बसस्थानक परिसरातील बोर्ड ग्रामपंचायत ने काढला

नवरगाव येथील दोनशे कुटुंब बौद्ध बांधवांनी जातीवादी लोकांच्या जाचाला कंटाळून सोडले गाव

गावगुंडांवर व ग्रामपंचायतवर केली कारवाईची मागणी

गडचिरोली( संजीव भांबोरे) चार्मोसी तालुक्यातील नवरगाव येथील गावात चौकात असलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे असलेले फलक येथील ग्रामपंचायत ने काढून टाकले. म्हणून 21 डिसेंबर 2023 ला येथील संपूर्ण 200 कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आला आहे .बोर्ड लावण्यापूर्वी येथील बौद्ध बांधवांनी ग्रामपंचायत ची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. मात्र नवरगाव येथील गावगुंडांनी व ग्रामपंचायत ने चौकात असलेले बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक फलक असलेले बोर्ड काढून टाकल्याने त्यांचा विरोध म्हणून येथील दोनशे कुटुंब बांधवांनी या गावात आपल्याला राहण्याचा कोणताच अधिकार नाही म्हणून घर आणि जमीन सोडून आपल्या बैलबंडी, लहान मूलबाळ ,म्हातारे व आपल्या कुटुंबाच्या जीवनावश्यक साहित्य घेऊन पायवाट मार्गाने निघाले असून आम्ही बाबासाहेबांचा अपमान सहन करू शकत नाही म्हणून त्यांनी गाव सोडले असून ग्रामपंचायत सरपंच सहित संपूर्ण ग्रामपंचायत सदस्यांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या गावात पुन्हा पाय न ठेवण्याचा निर्णय येथील बौद्ध कुटुंबाने घेतलेला आहे. या संपूर्ण कुटुंबाला न्याय देण्यात यावा याकरिता जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलावीत या घटनेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असून त्या पीडित कुटुंबांनी बोधिसत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कधी सहन करू शकणार नाही ही त्यांची मागणी रास्त असून ज्या गाव गुंडांनी व ग्रामपंचायत ने कृत्य केले त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार यांनी सुद्धा केलेली आहे.

Previous articleसंसदेतील खासदार निलंबनाचा निषेध गडचिरोलीत इंडिया आघाडीचे तीव्र निदर्शने
Next articleविदर्भवादी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पवनी तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here