Home जळगाव 13 हजाराची लाच मागणारा चाळीसगाव पाटबंधारे विभागाचा लिपिक धुळे ACB च्या जाळ्यात…

13 हजाराची लाच मागणारा चाळीसगाव पाटबंधारे विभागाचा लिपिक धुळे ACB च्या जाळ्यात…

222
0

आशाताई बच्छाव

IMG_20231215_204707.jpg

13 हजाराची लाच मागणारा चाळीसगाव पाटबंधारे विभागाचा लिपिक धुळे ACB च्या जाळ्यात…

मन्याड धरणातुन गाळ टाकण्यासाठी परवानगी साठी मागितली होती लाच…..

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – मन्याड धरणातुन गाळ टाकण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता कारण्यासाठी 13 हजार 300 रुपयांची लाच मागणाऱ्या चाळीसगांव पाटबंधारे उपविभागाच्या लिपीकास धुळे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दि 15 रोजी सकाळी 10-40 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले आहे.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने 4 लाखाची लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा हा प्रकार घडल्याने शासकीय पातळीवर चाळीसगाव विभागाचे नाव पुन्हा एकदा खराब झाले आहे.
लाच घेतली की कारवाई होते असे नाही तर लाच मागणाऱ्यावर देखील कारवाई होते हे आजच्या कारवाई वरून दिसून आले आहे.
चाळीसगाव मध्ये एकापाठोपाठ कारवाया होत असल्याने भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांना धडकी भरली आहे त्यामुळे आता कोणावर कारवाई होणार किंवा एखादा बडा मासा गळाला लागतो का अशी चर्चा जनमाणसांत होत आहे.
वेहेळगांव ता. नांदगांव येथील तक्रारदाराच्या आजोबांच्या शेत जमिनीत मन्याड धरणातुन गाळ टाकण्यासाठी परवानगी मिळणेकरीता आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन तकारदार व इतर 11 शेतक-यांनी उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगांव येथे अर्ज केला होता. यासाठी चाळीसगांव पाटबंधारे उपविभाग कार्यालयातील लिपीक
तुषार अशोक पाटील हा तकारदार यांना फोन करुन तक्रारदार यांचेकडे 13 हजार 300 रुपये लाचेची मागणीचा तगादा लावला होता. तक्रारदार यांनी वैतागुन त्यांनी केलेल्या लाच मागणीची धुळे लाचलुचपत विभागाकडे दुरध्वनीने माहिती दिली होती. त्यानुसार
लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रविण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर
यांनी दि 15 रोजी सापळा रचून सकाळी 10-30 वाजेच्या सुमारास लिपीक तुषार अशोक पाटील यास ताब्यात घेतले त्याचे विरूध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेडडी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

Previous articleअमरावती येथे विविध कार्यक्रमाचा आयोजन संत गाडगेबाबा६७व्या पुण्यतिथी महोत्सव.
Next articleभाजपाची घनसावंगी तालुक्याची कार्यकारिणी जाहीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here