Home जालना शहरातील रस्त्यांची कामे तात्काळ करून चांगल्या नागरी सुविधा पुरवा नसता शिवसेनेचे महापालिके...

शहरातील रस्त्यांची कामे तात्काळ करून चांगल्या नागरी सुविधा पुरवा नसता शिवसेनेचे महापालिके विरोधात तीव्र आंदोलन – जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20231215_074740.jpg

शहरातील रस्त्यांची कामे तात्काळ करून चांगल्या नागरी सुविधा पुरवा नसता
शिवसेनेचे महापालिके विरोधात तीव्र आंदोलन
– जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
जालना, दि. १४ (दिलीप बोंडे)-जालना शहरातील लक्कलकोट ते गांधी चमन,
उड्डाणपूल ते मुक्तेश्वर प्रवेशद्वार, गांधी चमन ते रेल्वे स्टेशन यासह
आदी रस्त्यांची कामे तात्काळ सुरू करून चांगल्या नागरी सुविधा द्या नसता
शिवसेनेच्या वतीने महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी दिला. यासंदर्भात महानगर पालिकेच्या
आयुक्तांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
पुढे म्हणाले की, जालना नगर परिषदेचे महानगर पालिकेत रूपांतर होऊन अनेक
महिने लोटले,महापालिका झाल्यानंतर आता नागरी समस्या सुटतील व आम्हाला
चांगल्या सुविधा मिळतील हा आशावाद जनतेच्या मनात निर्माण झाला परंतु
प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. शहरातील रस्ते, पाणी आदी नागरी
समस्यांनी नागरिक अद्यापही त्रस्त आहेत. शहरातील लक्कडकोट ते म.गांधी
चमन, उड्डाणपूल ते मुक्तेश्वर प्रवेशद्वार, म. गांधी चमन ते रेल्वेस्टेशन
यांसह इतरही शहरातील अत्यंत महत्त्वाचे व प्रमुख रस्ते आहेत. या
रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर
वाहतूक असते. आज या रस्त्यावरून वाहन चालविणे अत्यंत अवघड झाले आहे. पण
महापालिकेने याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.
यापूर्वीही कन्हैयानगर रस्ता, नूतन वसाहत समोरील रस्ता, बडी सडक या
रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे व खड्ड्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेले
अपघात यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आंदोलने
केली. पक्षाच्या वतीने केलेल्या आंदोलना नंतरच पालिकेने या रस्त्यांची
कामे हाती घेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here