राजेंद्र पाटील राऊत
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून पती पोलिसांच्या ताब्यात
नांदेड-(मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे नंदगाव येथील दत्तात्रय तांबोळी यांनी आपल्या पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेऊन दि. ३० नोव्हेंबर रोजीच्या रात्री गळा दाबून खुन केल्यांची घटना घडली. तालुक्यातील नंदगाव येथील दत्ता काशिनाथ तांबोळी यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत व माहेरावून पैसे घेऊन ये म्हणत दारूच्या नशेत भाग्यश्री उर्फ सुलोचना हिस दररोज मारहाण करीत असत दि. ३० नोव्हेंबर रोजी दत्ता दारू पिवून पत्नीस मारहाण करित त्याच्या घरातील पलंगावर घेऊन जाऊन गळ्याला हातानी दाबून खुन केला. त्यावेळी लहान मुलगी सर्व घटना बघितले असल्यांची माहिती मयत भाग्यश्री च्या माहेरच्या नागरीकानी दिली.
सदरील घटनेची माहिती गावातील पोलीस पाटील यांनी पोलिसांना देताच पोलीस उपनिरिक्षक गजानन आन्सापूरे, पोना डि. एम. धोंडगे, पोकाॅ. सचिन मुतपवार, बळीराम सुर्यवंशी यांनी घटना स्थळी धाव घेऊन आरोपी दत्ता तांबोळी यांना मोठ्या हीतापळीने अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आहे.
दरम्यान मयत भाग्यश्री उर्फ सुलोचना हीस दोन मूली असून त्यातील एक मुलगी ३ वर्षाची व पाच वर्षाची एक मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे. मयत भाग्यश्री यांचे वडील दत्ता देवराव इंद्राक्ष यांच्या फिर्यादीनुसार आरोपी दत्ता काशिनाथ तांबोळी यांच्यावर कलम गुन्हा रजिस्टर क्रमांक 347/2021 कलम 302 भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरिक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रकाश कुंभारे करीत आहेत