आशाताई बच्छाव
ॲडव्हान्स न दिल्यामुळे सुवर्णकराचा खून बांधकाम मिस्त्री ने केला भूत व खून प्रकरणाचा ३६एलसीबीने लावला छडा. आरोपी कडून 75 लाख 37 हजाराचे सोने जप्त
————-
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती/ (तिवसा) अमरावती जिल्ह्यातील तिवसायेथे घरात घुसून ७५ लाखाचे दागिने व रोग अन्य युवक लुटून दिवसा येथील सुवर्णकार संजय मंडळे यांचा खून करण्यात आला होल करणारा आरोपीस पोलिसांनी तपास करून पकडले. आरोपी हा बांधकाम मिस्त्री असून तो मागील ३ते४ महिन्यापासून संजय मंडळे यांच्या घरी काम करत होता. त्या आरोपीस स्थानिक गुन्हे पोलीस शाखेच्या जम्बो पथकाने ३६ तासात अटक केली. पोलिसांनी पोलिसांनी त्या आरोपीकडून 75.37 लाखाचे सोन्याचे दागिने जप्त केले असल्याचे माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. रोशन दिगंबर राव तांबटकर वय २५रा. देऊरवाडा कौंडण्यपूर ता.आर्वी जी.वर्धा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सायंकाळी संजय मांडळे वय ५५हे तिवसायेथे एकटेच घरी होते. त्यांची पत्नी व मुलगा वैशाख रुग्णालयाच्या कामासाठी अमरावतीला गेले होते .त्यावेळी रोशन तांबटकर हा संजय मांडळेकळे घरी गेला व त्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांचा खून केला. त्यानंतर त्याने घरातील कपाटतील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. त्यादरम्यान आरोपीने खुनाची कबूरी दिली आहे .त्याने मंडळे यांना५ हजार रुपये ऍडव्हान्स मागितला होता. मात्र देण्यास नकार दिल्यामुळे त्याने मंडळे यांचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. दरम्यान ७४.६८ लाख रुपयाचा ऐवज आरोपींनी लुटून नेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली आहे. आरोपी रोशन तांबटकर गर्दीत घरी आला. रोशन हा खून करून घटनास्थळावरून निघून गेला. रात्री आठ वाजताच्या सुमारास तू नागरिकांच्या गर्दीत मांडले यांच्या घरी आला होता इतकेच नाहीतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी अंत्ययात्रेतील तो सहभागी झाला होता. दरम्यान स्थानिक गुन्हे पोलीस शाखेच्या पथकाला त्याच्या संशय आल्यामुळे पोलिसांनी त्याला रात्री चौकशीसाठी बोलावले होते, खात्री झाल्यानंतर पुन्हा त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन खून प्रकरणी तोच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यावर उशिरा रात्री तिवसा पोलिसांनी त्याला अटक केली.