Home उतर महाराष्ट्र केंद्रीयमंत्री डॉ भारती पवारांनी केली नांदगाव तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेत...

केंद्रीयमंत्री डॉ भारती पवारांनी केली नांदगाव तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेत शिवाराची पाहणी

54
0

आशाताई बच्छाव

IMG_20231129_100651.jpg

नांदगाव प्रतिनिधी :(अनिल धामणे) नांदगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन स्विय सहायक प्रवीण रौंदळ यांनी जामदरी भागातील पहाणी दौऱ्याप्रसंगी दिले. यावेळी जेष्ठ नेत्या ॲड जयश्री दौंड गणेश शिंदे उपस्थित होते
नांदगाव तालुक्यात रविवारी झालेल्या गारपीट आणि वादळी पावसामुळे अगोदरच दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी बांधवांच्या पिकांचे, घरांचे, जनावरांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या प्रकोपाची तत्काळ दखल घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहायक प्रवीण रौंदळ, ॲड जयश्री दौंड यांनी नांदगाव तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व सरसकट पंचनामे करावे अशा सूचनाही उपस्थित सर्कल, तलाठी, ग्रामसेवक यांना दिल्या आणि कोणत्या ही अधिकाऱ्याने नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात कसूर केल्यास त्यांची गय केली जाणार नाही अशा सुचना यावेळी दिल्या. नामदार भारती पवार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कडे नुकसान भरपाई मिळुन देण्या साठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रौंदळ
यांनी शेतकऱ्यांना दिले.
यावेळी तालुका प्रमुख गणेश शिंदे भा.ज.पा च्या जेष्ठ नेत्या ॲड. जयश्री दौंड, सजन तात्या कवडे, माझी नगराध्यक्ष, राजाभाऊ बनकर, संदिप पगार, राजेंद्र गांगुर्डे, दिनेश दिंडे, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तथा भा.ज.पा चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमहाराष्ट्र राज्य आट्यापाट्या संघ जाहीर
Next articleलोकस्वातंत्र्य महाराष्ट्रात झपाट्याने पसरत चाललेला गतिमान पत्रकार महासंघ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here