Home जालना सतीश घाटगेंनी पूर्ण केला शेतकऱ्यांना दिलेला शब्द ‘समृद्धी’कडून अंतीम हप्त्याची घोषणा :...

सतीश घाटगेंनी पूर्ण केला शेतकऱ्यांना दिलेला शब्द ‘समृद्धी’कडून अंतीम हप्त्याची घोषणा : शंभर रूपयाप्रमाणे सोमवारी खात्यात वर्ग होणार रक्कम

27
0

आशाताई बच्छाव

IMG_20231124_065612.jpg

सतीश घाटगेंनी पूर्ण केला शेतकऱ्यांना दिलेला शब्द
‘समृद्धी’कडून अंतीम हप्त्याची घोषणा : शंभर रूपयाप्रमाणे सोमवारी खात्यात वर्ग होणार रक्कम

घनसावंगी/जालना , दिलीप बोंडे: गाळप हंगाम २०२२ -२३ मध्ये समृद्धी साखर कारखान्यात गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपी पेक्षा 110 रूपये वाढीव बोनस देण्याचा निर्णय कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी घेतला होता. दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्यासाठी कारखान्याने अंतिम हप्ता 100 रूपये प्रती मे. टन प्रमाणे देण्याची घोषण केली असून, सोमवार (दि.27) रोजी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार असल्याची माहिती सतीश घाटगे यांनी दिली आहे.

गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये गाळप  झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला  घनसावंगी तालुक्यातील समृद्धी साखर कारखान्याने  शेतकऱ्यांच्या उसाला 2800 रुपये प्रती मेट्रीक टन असा भाव जाहीर केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला सन २०२२-२३ मध्ये मराठवाड्यात सर्वाधिक दर समृद्धी कारखान्याचा ठरला. जाहीर केलेल्या दरानुसार समृद्धी कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऑक्टोबर 2023 पर्यंत  2 हजार 700 रुपये टन प्रमाणे रक्कम अदा करण्यात आल्यानंतर आता 27 नोव्हेंबर रोजी 100 रूपये प्रती मे. टनाप्रमाणे अंतीम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी बुधवारी दिली.

कोट

गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये समृद्धी काखान्यात गाळप झालेल्या शेतकऱ्यांच्या उसाला मराठवाड्यातील इतर कारखान्यापेक्षा सर्वाधिक दर समृद्धी कारखान्याने  दिला. जाहीर केलेल्या दरानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात अंतिम हप्ता वर्ग केल्यानंतर २८०० रुपये प्रती मे. टन प्रमाणे रक्कम जमा होणार आहे. सोमवार पर्यंत  उसाचा अंतिम हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.  
 
सतीश घाटगे, चेअरमन, समृद्धी साखर कारखाना,   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here