Home जळगाव आमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना…

आमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना…

87
0

आशाताई बच्छाव

IMG_20231121_061936.jpg

आमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना…

शिवरायांची वाघनखे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक व महात्मा गांधी यांचे स्मारक यांना करणार अभिवादन

मुंबई प्रतिनिधी विजय पाटील– जगभरातील विविध क्षेत्रांचा, तंत्रज्ञानाचा तसेच समाजोपयोगी धोरणांचा अभ्यास करण्यासाठी विधिमंडळातील आमदारांचे अभ्यास दौरे आयोजित केले जातात. यावर्षी लंडन येथील जगप्रसिद्ध वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड (UWTSD) निमंत्रणावरून महाराष्ट्रातील १२ आमदारांचे शिष्टमंडळ दि.२० ते २५ नोव्हेंबर २०२३ दरम्यान ब्रिटन (युके) येथे अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.
यात चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांची देखील निवड झाली असून ते दि.१९ रोजी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सकाळच्या विमानाने लंडन रवाना झाले आहेत. प्रदीर्घ कालावधीनंतर विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्यासाठी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळाल्याने आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
या अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने वेल्स, यूके येथील विद्यापीठात सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयावरील कार्यकारी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. वेल्समधील UWTSD च्या लॅम्पीटर कॅम्पसमध्ये, विविध सांस्कृतिक भेटींबरोबरच सुशासन आणि सार्वजनिक धोरण या विषयांवर आणि आसपासच्या अनेक दिवसांच्या कार्यशाळांचा भाग आमदार असतील. या कार्यक्रमात कार्डिफमधील सेनेड असेंब्लीला आणि वेस्टमिन्स्टर येथील संसदेच्या सभागृहांना भेट देणे देखील समाविष्ट आहे. कार्यक्रमाची समाप्ती व्हाईटहॉलमधील नॅशनल लिबरल क्लबमध्ये औपचारिक डिनरद्वारे केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा वध केला होता ते वाघनखे ठेवण्यात आलेल्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियमला आमदारांचे शिष्टमंडळ भेट देणार असून आपल्या महाराष्ट्राच्या एका दैदिप्यमान अश्या इतिहासाची खून असणाऱ्या शिवरायांच्या वाघनखांचे दर्शन यानिमित्ताने होईल,
यासोबतच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रयत्नांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील निवासस्थानाचे भव्य स्मारकात रुपांतर करण्यात आले आहे, सदर स्मारकाला तसेच लंडन येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्याला देखील आमदारांचे शिष्टमंडळ अभिवादन करणार आहेत.

Previous articleदोन भरधाव वाहणाची आमोरासमोर धडक;दोन गंभीर जखमी गोबरवाही-चिचोली रस्त्यावरील घटना
Next articleविवाहितेला ५० हजारांसाठी मारहाण करत छळ ; जळगाव तालुका पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here