Home भंडारा दोन भरधाव वाहणाची आमोरासमोर धडक;दोन गंभीर जखमी गोबरवाही-चिचोली रस्त्यावरील घटना

दोन भरधाव वाहणाची आमोरासमोर धडक;दोन गंभीर जखमी गोबरवाही-चिचोली रस्त्यावरील घटना

113
0

आशाताई बच्छाव

IMG_20231120_190022.jpg

दोन भरधाव वाहणाची आमोरासमोर धडक;दोन गंभीर जखमी

गोबरवाही-चिचोली रस्त्यावरील घटना

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) दोन विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यात दोन दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. सदर अपघात तुमसर तालुक्यातील गोबरवाही- चिचोली दरम्यान आंतरराज्य मार्गावर सोमवारी ता.२० नोव्हेंबर दुपारी १२.२५ च्या दरम्यान घडला. जखमींना उपचाराकरिता तुमसर येथे दाखल करण्यात आले आहे.
अपघातात गंभीर जखमींची नावे दिनेश मनोहर कुंभलकर(४०) राहणार डोंगरी बु. व प्रवीण सोनवाणे(४६) राहणार इंदिरानगर, तुमसर अशी आहेत.
दिनेश कुंभलकर वय (४०) हे डोंगरी बु. येथून दुचाकी होंडा सीडी डीलक्स क्रमांक एम. एच.३६ ए.६५५५ दुचाकीने गोबरवाही वरून तुमसरकडे येत होते. तर प्रवीण सोनवणे वय(४६) रा. इंदिरा नगर तुमसर दुचाकी क्रमांक एम. एच.३१ ए.जे.६२६ ने तुमसर वरून डोंगरी येथे जात होते. चिचोली गोबरवाही दरम्यान दोन्ही भरधाव दुचाकी आमोरासमोर धडकल्या. त्यात दिनेश कुंभलकर व प्रवीण सोनवाणे हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्त पडून होते. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही दुचाकींच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. फिर्यादी डॉ मेमो एम.एल. सी. लेखी रिपोर्ट वरून गोबरवाही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.यात सहायक पोलीस निरीक्षक नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर घटनेचा तपास गौरीशन्कर कडव करीत आहेत

Previous article  जिद्द, चिकाटी प्रामाणिकपणा मुळे आपल्या ध्येयापर्यत आपण पोहचू शकतो.– प्रा.प्रेमानंद हटवार
Next articleआमदार मंगेशदादा चव्हाण ५ दिवसांच्या लंडन येथील अभ्यास दौऱ्यासाठी रवाना…
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here