Home भंडारा   जिद्द, चिकाटी प्रामाणिकपणा मुळे आपल्या ध्येयापर्यत आपण पोहचू शकतो.– प्रा.प्रेमानंद हटवार

  जिद्द, चिकाटी प्रामाणिकपणा मुळे आपल्या ध्येयापर्यत आपण पोहचू शकतो.– प्रा.प्रेमानंद हटवार

156
0

आशाताई बच्छाव

IMG_20231120_185414.jpg

जिद्द, चिकाटी प्रामाणिकपणा मुळे आपल्या ध्येयापर्यत आपण पोहचू शकतो.– प्रा.प्रेमानंद हटवार

वलनी चौ. येथे  स्विमिंग शिबिर जोमात

संजीव भांबोरे
   भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पहिल्यांदाच मुलींचा स्विमिंग शिबिर जोरात सुरू. मौजा वलनी (चौ.) येथे पहिल्यांदाच श्री. मा. लोहितजी मतानी सर ( पोलीस अधीक्षक भंडारा) तसेच भंडारा पोलीस युथ फोरम यांच्या मार्गदर्शनाखाली वलनी (चौ.) येथे 03: 11:2023 पासून 27:11:2023 पर्यंत शिबिराचे आयोजन केलेले आहे. त्या अंतर्गत मुलींसाठी दिनांक 14 नोव्हेंबर 2023 ते 20 नोव्हेंबर 2023 सात सात दिवसीय स्विमिंग शिबिराचे आयोजन करून त्यात अनेक मान्यवरांना मार्गदर्शन करण्यासाठी पाचारण केले जाते. मार्गदर्शनसाठी विविध प्रमुख पाहुणे शिबिराला भेट देत आहेत. मुलींच्या जलतरणाच्या पाचव्या दिवशी प्रा. प्रेमानंद हटवार सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार यांची शिबिर ला भेट देऊन मुलींना बाल संस्कार आणि स्पर्धा परीक्षेबद्दल योग्य असे मार्गदर्शन केलं. त्यात नियोजनबद्ध अभ्यासामुळे, जिद्द, चिकाटी प्रामाणिकपणा यांच्या भरोशावर आपण आपले ध्येय प्राप्त करू शकतो. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत कुठेही मागे नाही. ग्रामीण विद्यार्थी देखील खूप हुशार असून त्याला जर  योग्य मार्गदर्शन मिळालं तर गावातून डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे विद्वान महापुरुष घडू शकतात आणि तुमच्या सर्वांमध्ये त्या क्षमता आहेत. असे मत  प्रा. हटवार यांनी आपल्या मागदर्शात व्यक्त केले. त्यावेळी  उपस्थित प्रमुख मान्यवर म्हणून मांगली (चौ.) चे सुपुत्र प्रकाश मोरेश्वर  पडोळे भारतीय लष्करात सध्या कार्यरत यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनात मुख्य भूमिका नामदेव मेश्राम, जोसेफ वाढई, क्षितिज चहांदे,शुभम रामटेके, पिंटू रामटेके, शिवदास वैद्य, शुभम वैद्य, आशिष जीभकाटे, हिमेश जांभुळकर, सचिन सेलोकर, सचिन जीभकाटे वैभव भाजीपाले, धीरज उकरे, मिथुन जिभकाटे, सत्यवान जिभकाटे,अनंत ईखार, तुषार ईखार, ताराचंद सेलोकर, भूषण थेरे, शत्रुघ्न वैद्य, अमोल मेश्राम, गणेश खांदाडे, वैभव भाजीपाले आणि गांधी विद्यालय वलनी येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचे सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात या उपक्रमाला लाभत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here