Home भंडारा शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे ज्ञानसाधना व व्यक्तिमत्त्व विकास धम्म शिबिराला...

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे ज्ञानसाधना व व्यक्तिमत्त्व विकास धम्म शिबिराला सुरुवात

102

आशाताई बच्छाव

IMG_20231114_083635.jpg

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे ज्ञानसाधना व व्यक्तिमत्त्व विकास धम्म शिबिराला सुरुवात

जिल्हाप्रतिनिधी संजीव भांबोरे
भंडारा – पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी( चिचाळ) येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ सेंटर धम्म वर्ग पवनी यांच्या विद्यमाने 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर 2023 पर्यंत ज्ञानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराला सुरुवात करण्यात आलेली आहे. या धम्म शिबिरात एकूण 50 प्रशिक्षणार्थी यांनी शिबिरात भाग घेतलेला आहे या धम्म शिबिराला मार्गदर्शक म्हणून धम्मचारींनी कमलश्री बोरधरण ,धम्मचारीनी ज्योतीप्रभा, धम्मचारींनी आर्यपदमा ,धम्मचारी विमलरत्न नागपूर ,धम्मचारी पदमसुर नागपूर, धम्मचारी विमलरत्न या मार्गदर्शन करीत आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धम्मात आहे .माझे गुरु बुद्धाच्या शिकवणीतून हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केले आहे. बौद्ध धर्म हा चिकित्सेनंतर सांगितलेला धर्म आहे. रोज निदानानंतर दिलेला औषध आहे. या निवासी धम्म ज्ञान शिबिरात राहण्याची ,जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे .या संपूर्ण शिबिरावर शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. आज दिनांक 13 नोव्हेंबर 2023 ला पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे यांनी शांतीवन बुद्ध विहाराला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या धम्म साधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराबाबत समाधान व्यक्त केले.

Previous articleहनुमान देवस्थान पंच कमिटी निमगाव व ग्रामस्थांच्या वतीने कुस्त्यांची आमदंगल कार्यक्रम संपन्न
Next articleमध्य रेल्वे ला मालवाहतुकीतून ८०२ कोटीची कमाई, गेल्या वर्षाच्या तुलनेत २६.१० टक्के वाढ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.