Home गुन्हेगारी आजची हिच ती कोजागिरीची काळी रात्र..! संपूर्ण महाराष्ट्र हादरला मोठया हत्याकांडाने…!

आजची हिच ती कोजागिरीची काळी रात्र..! संपूर्ण महाराष्ट्र हादरला मोठया हत्याकांडाने…!

238
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231028-191756_Google.jpg

आजची हिच ती कोजागिरीची काळी रात्र..!
संपूर्ण महाराष्ट्र हादरला मोठया हत्याकांडाने…!
(राजेंद्र पाटील राऊत)
मालेगांव- आज कोजागिरी पोर्णिमा.बरोबर आजच्याच दिवशी २७ वर्षापूर्वी घडलेल्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता.
नाशिकच्या मालेगाव शहराजवळील सोयगांव सब स्टेशन जवळील बंगल्यात सन १९९६ साली हे हत्याकांड घडले होते.संपतीच्या वादातून सख्खा भाऊ कसा वैरी होतो हे तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला बघायला मिळाले होते.सोयगांवच्या सब स्टेशन रोडला कृषी अधिकारी एस.डी.पाटील यांचा परिवार शेतात बंगला बांधून आई केशरबाई पाटील यांच्या समवेत राहत होता.केशरबाई पाटील यांना अजून एक प्रकाश नावाचा सावत्र मुलगा होता.पण तो नाशिकला दिंडोरी रोडवरील मेरीला राहून कसेबसे आपले कुटूंब सांभाळत होता.आणि सावत्र भाऊ एस.डी.पाटील आपल्याला आपल्या शेतीत व संपतीत वाटा देत नाही,म्हणून प्रकाश पाटीलने आपल्या मुलांच्या संगनमताने भयानक असे कटकारस्थान रचले.कोजागिरी पौर्णिमेला एस.डी.पाटील यांच्या मुलाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रकाश पाटीलच्या मुलाने मालेगावी काका एस.डी.पाटील यांच्या घरी सब स्टेशनजवळ भेट दिली.व वाढदिवस रात्रीचा असल्यामुळे तेथेच मुक्कामाचा बहाणा करुन थांबला.कोजागिरीच्या मध्यरात्री सगळे पाटील कुटूंबिय गाढ झोपलेले असताना,प्रकाश पाटील यांच्या माथेफिरु मुलाने डबल बोर बंदुकीतून गोळ्या झाडून आजी केशरबाई पाटील,चुलती पुष्पा पाटील ,चुलता सुपडू पाटील,आणि चुलत भाऊ व दोन चुलत बहिणी अशा सहा जणांची निघृर्णरित्या हत्या करुन संपतीत वाटा देत नाही म्हणून असा बदला घेतला.पुढे या गुन्ह्याचे प्रकरण अनेक वर्ष चालले.त्याला आता २७ वर्ष झालीत.एस.डी.पाटील यांचा सब स्टेशनजवळील बंगला आजही निर्जन व ओसाड पडलेला आहे.कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री सहा खुन बघणारा हा बंगला या घटनेचा मुक साक्षीदार म्हणून बेवारस अवस्थेसारखा पडला आहे.मात्र दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला या बंगल्यात झालेल्या निर्घृण हत्याकांडाने आजही अंगावर शहारे येतात.अन साहजिकच त्या कोजागिरीच्या काळ्या रात्रीच्या स्मृती जाग्या होतात.

Previous articleमराठा आरक्षण आणि आंदोलनाची दिशा व दशा!
Next articleठेंगोडयात डेंगूचे थैमान एक तरुणीचा बळी;शंभरावर रुग्ण प्रशासनाचा निष्काळजीपणा भोगताय नागरीक!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here