Home बुलढाणा सोनाळा पो. स्टे. येथील विवाहित पोलिसांनी आमिष दाखवून तरुणीला पळवले

सोनाळा पो. स्टे. येथील विवाहित पोलिसांनी आमिष दाखवून तरुणीला पळवले

110

आशाताई बच्छाव

IMG-20220701-WA0029.jpg

सोनाळा पो. स्टे. येथील विवाहित पोलिसांनी आमिष दाखवून तरुणीला पळवले

संग्रामपूर तालुका विशेष प्रतिनिधी
युवा मराठा न्यूज नेटवर्क

संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा पोलिस स्टेशन येथील वाहतूक पोलीस पदावर कर्तव्यावर असलेल्या एका विवाहित पोलिसांनी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी मुलगी परत आणून द्या, अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की माझी तरुण मुलगी ही शिकवण क्लासचे शिक्षक घेत आहे तिला सोनाळा पोलीस ठाण्यातील ट्राफिक पोलीस पदावर कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल अमोल बोदडे या दोन मुलांच्या बापाने नोकरी लावून देतो असे सांगून 20 जून रोजी पळवून नेले तामगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता गेलो असता तामगाव पोलिसांनी मिसिंगची तक्रार देण्याचे सांगितले असता तशी तक्रार दिली आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे देखील 24 जून 2022 रोजी प्रत्यक्ष भेटून तक्रार दिली आहे मात्र अद्यापही अमोल बोदडे या पोलीस कर्मचाऱ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे 4 जुलै रोजी पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा लेखी तक्रारी द्वारे दिला आहे.

Previous articleवसंतराव नाईक यांची जयंती साजरी
Next articleनेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल येथील विदयार्थ्याच्या वतीने वळग येथे कृषी दिन उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.