आशाताई बच्छाव
नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महाविद्यालय मरखेल येथील विदयार्थ्याच्या वतीने वळग येथे कृषी दिन उत्साहात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर -दि.०१जुलै, कृषी महाविद्यालय मरखेलच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक सन्लग्नता उपक्रमा अंतर्गत मौजे वळग येथे कृषिदीन उत्साहात साजरा केला.
महाराष्ट्रात दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो, तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस कृषी महािद्यालय, मरखेलच्या विध्यार्थाच्या वतीने वळग या गावामध्ये वृक्षदिंडी, वृक्षारोपण, शेतकऱ्यांना ‘फळझाडे रोपे वाटप कार्यक्रम, शाळेतील विद्यार्थ्यांना फळे बिस्कीट व चॉकलेट वाटप इत्यादी उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले जि.प.शाळां मुख्याध्यापक मा. मारकवाड सर . तसेच शिक्षण समिती सदस्य पत्रकार चंद्रकांत गज्जलवार व मा.मनोज पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळग शिक्षक वृंद अग्रेसर , गज्जलवार सर , मुळे सर, वट्टमवार सर, भंगे सर, देशमुख सर,राठोड सर, उमेश महाराज, रमेश महाराज, अंगणवाडी ताई , व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच प्रमुख पाहूणे म्हणून महाविदयालयाचे उप प्राचार्य. एम.आर.मुळे सर व महाविद्यालयाचे नोडल ऑफिसर प्रा. एस.एम. चौधरी सर व रावे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रफुल्ल पाटील सर यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम योग्य रीतीने पार पाडण्यासाठी सूत्र संचलन करणारे सुयश लांडगे,धिरज देमगुंडे,सौरभ मोरे,ओम पुरी,यश गडसिंग,सुनिल राठोड,रोहन रत्नागीरे,रोहन मिटेवाड, पंकज चहाण,कृपाल कणका या सर्व कृषी दुताच्या अथक परिश्रमामुळे यशस्वीरित्या पार पडला..






