Home मुंबई आझाद मैदानावर ‘ऑफ्रोह’चे बेमुदत धरणे आंदोलन

आझाद मैदानावर ‘ऑफ्रोह’चे बेमुदत धरणे आंदोलन

140
0

आशाताई बच्छाव

IMG-20231027-WA0063.jpg

आझाद मैदानावर ‘ऑफ्रोह’चे बेमुदत धरणे आंदोलन

मुंबई : ( प्रतिनिधी विजय पवार )
अधिसंख्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी/कर्मचा- यांना नियमानुसार अनुज्ञेय असलेले सेवानिवृत्तीवेतन व सेवानिवृत्तीविषयक लाभ
देण्यात यावेत’, असे शासनाचे आदेश असतानाही बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व बेस्ट प्रशासनातील काही अधिकारी मात्र शासनाचे आदेश धुडकावून लावत 64 सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना त्यांच्या न्याय हक्काच्या सेवानिवृत्तीवेतन व अनुषंगिक लाभांपासून वंचित ठेवत आहेत. त्यामुळे या अन्यायाविरूद्ध ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) शाखा ठाणेच्या माध्यमातून एल्गार पुकारला असून 26 ऑक्टोबरपासून मुंबई महानगरपालिकेसमोर लोकशाही पद्धतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या सेवानिवृत्त कर्मचा-यांना न्याय द्यावा,अशी मागणी ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर,महिला आघाडीच्या उपाध्यक्ष प्रियाताई खापरे,राज्य कार्यकारिणी सदस्य नरेश खापरे , जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी,उपाध्यक्ष अर्जून मेस्त्री,अशोक बुरडे,सचिव घनश्याम हेडाऊ,कोषाध्यक्ष नरेंद्र भिवापूरकर यांनी केली आहे. शासन निर्णय दि. २१/१२/२०१९ व १४/१२/२०२२ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेतील तसेच बेस्ट उपक्रमातील अधिसंख्य पदावरील व अधिसंख्य पदावर वर्ग न केलेल्या नियमितपणे सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी – कर्मचारी यांना तातडीने सेवानिवृत्ती वेतन, ग्रॅज्यूटी व इतर सेवाविषयक लाभ मिळावेत तसेच हे लाभ देण्यास विलंब झाल्यामुळे मॅट च्या आदेशानुसार निवृत्तीवेतनावर ६ टक्के व ग्रॅज्यूटीवर ८ टक्के व्याजासह रक्कम सेवानिवृत्तधारकांना अदा करण्यात यावे व इतर मागण्यासाठी या सेवानिवृत्त कर्मचा-यांनी ऑफ्रोहच्या बॅनरखाली आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
बेस्ट आणि मुंबई महानगरपालिकेतील
विलास कुंभारे,शरद अर्जितवार,संतोष सोळंके
प्रभाकर सरतांडेल ,किसन पवनीकर,किशोर डेकाटे
किरण दापोडकर,लक्ष्मण डेकाटे यांच्यासह
सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी व ऑफ्रोह संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी,कोषाध्यक्ष नरेंद्र भिवापूरकर, समिता भोईर,अजय कोळी,प्रकाश कोळी,अश्विन कोळी, नितीन केणी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here