Home नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रं 63 अंतर्गत उदगिर -देगलुर- अदमपुर-सगरोली -बोधन रस्त्याच्या कामास त्वरित...

राष्ट्रीय महामार्ग क्रं 63 अंतर्गत उदगिर -देगलुर- अदमपुर-सगरोली -बोधन रस्त्याच्या कामास त्वरित सुरुवात करण्याची मागणी.

41
0

आशाताई बच्छाव

IMG_20240117_210915.jpg

राष्ट्रीय महामार्ग क्रं 63 अंतर्गत उदगिर -देगलुर- अदमपुर-सगरोली -बोधन रस्त्याच्या कामास त्वरित सुरुवात करण्याची मागणी.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-राष्ट्रीय महामार्ग क्रं 63 बार्शी-लातूर- ऊदगीर -देगलूर-आदमपुर-सगरोळी-निजामाबाद
-मेटपल्ली-चिन्नूर—छत्तीसगड मध्ये विजापूर-पुढे ओरिसा महामार्ग या अंतर्गत उदगिर-देगलूर-आदमपुर- सगरोळी-बोधन या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली असुन ,रस्त्यावर दिड-दोन फुटाचे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणत अपघात घडत आहेत म्हणून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन महामार्ग 100 फूट रुंदीचा रस्ता त्वरित सुरु करावे,असे देगलूर व बिलोली तालुक्यातील जनतेची व लोकप्रतिनिधीची मागणी आहे. याकरीता राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात जावुन अभियंता यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यांत आली. व या महामार्गाच्या कामास लवकर सुरुवात करावी अशी मुख्य अभियंता , राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प याना निवेदन देण्यात आले. याबेळी सोबत लघुलचे मा. सरपंच श्री बाबुराव गोसलोड हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here