Home मराठवाडा वैजापूरजवळील अपघात; मुख्यमंत्र्यांना दुःख

वैजापूरजवळील अपघात; मुख्यमंत्र्यांना दुःख

52
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231016-075050_WhatsApp.jpg

वैजापूरजवळील अपघात; मुख्यमंत्र्यांना दुःख

प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी युवा मराठा न्युज

मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये

जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश

मुंबई, १५ – नागपूर – मुंबई समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ मध्यरात्री झालेल्या टेम्पोच्या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली असून जखमींवर शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. अपघात झाल्याचे समजताच लगेच बचाव कार्य सुरू करण्यात आले, याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करून तपास करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

पालकमंत्री, गृहनिर्माणमंत्र्यांची घटनास्थळी आणि रुग्णालयास भेट; जखमींची विचारपूस

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानराव भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली, त्यानंतर या अपघाताचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला.
या अपघातातील १७ जखमींवर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात आणि ६ जखमींवर वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून या रुग्णालयांत मंत्री श्री. भुमरे आणि श्री. सावे यांनी भेट दिली आणि जखमींची विचारपूस केली. तातडीचे आणि योग्य ते उपचार करण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

Previous articleअवयवदान : श्रेष्ठतम दान !
Next articleमराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here