• Home
  • पुण्यात या ठिकाणी आहे! तरुणांना रोजगारासाठी संधी

पुण्यात या ठिकाणी आहे! तरुणांना रोजगारासाठी संधी

🛑पुण्यात या ठिकाणी आहे!
तरुणांना रोजगारासाठी संधी 🛑
✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

शिरूर (पुणे) :⭕ कोरोनामुळे सुमारे दहा हजार परप्रांतीय व विदर्भ, मराठवाड्यातील पाच हजार कामगार आपल्या मूळ गावी गेले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्‍याच्या औद्योगिक पट्ट्यात किमान 15 हजार जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. स्थानिक तरुणांना यानिमित्त मोठी संधी निर्माण झाली आहे.

रांजणगाव एमआयडीसीत सुमारे 25 हजार परप्रांतीय आणि राज्याच्या विविध भागांतील दहा हजार कामगार कोरोनाच्या संकटापूर्वी कार्यरत होते.
मात्र, लॉकडाउन लागू झाल्यानंतर अनेक कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे यातील अनेक कामगारांनी घरचा रस्ता धरला. मध्य प्रदेश व छत्तीसगडला दहा हजार; तर विदर्भ, मराठवाडा, नागपूर, औरंगाबाद, धुळे भागातील किमान पाच हजार कामगार आपल्या मूळ गावी निघून गेले. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर कंपन्या सुरू होऊन आता दोन हजारांच्या आसपास कामगार कामावर परत आले असले, तरी अनेकांनी पाठ फिरवली आहे. कामगारांअभावी कंपन्या देखील पूर्ण क्षमतेने चालू शकत नसल्याचे एमआयडीसीतील सध्याचे चित्र आहे.
या पार्श्‍वभूमीवर स्थानिकांना औद्योगिकीकरणात सामावून घेण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांनी कारखानदारांची बैठक बोलावली होती. पहिल्या टप्प्यात व्हर्लपूल, एलजी, ब्रिटानिया, आयटीसी व हायर या कंपन्यांच्या प्रतिनिधींना बोलाविण्यात आले होते. इतर कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही टप्प्याटप्प्याने बोलविले जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

या बैठकीत एमआयडीसीतील रोजगाराच्या संधींबाबतची माहिती पुढे आली. “आम्हाला ज्या कौशल्याचे कामगार हवे आहेत, त्यांची माहिती येत्या दोन दिवसांत प्रशासनाला कळविली जाईल,’ असे कारखानदारांकडून सांगण्यात आले. सर्वच उद्योगांमध्ये कामगारांची वानवा जाणवत असल्याने विविध कंपन्यांनी कामगार भरती सुरू केली आहे…⭕

anews Banner

Leave A Comment