• Home
  • मालमत्ता वादातून भावाने केली भावाची कुऱ्हाडीने हत्या

मालमत्ता वादातून भावाने केली भावाची कुऱ्हाडीने हत्या

🛑 ! धक्कादायक ! 🛑
मालमत्ता वादातून भावाने केली भावाची कुऱ्हाडीने हत्या!
✍️ पुणे( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

जुन्नर (पुणे):⭕प्रॉपर्टीच्या वादातून चुलत भावानेच भावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील वारूळवाडी आनंदवाडी येथे ही घटना घडली असून आरोपी फरार झाला आहे.

आनंदवाडी येथील अमोल उर्फ पामर भुजबळ (वय 28) याने महेश धनराज भुजबळ (वय 22) या आपल्या सख्ख्या चुलत भावाचा कुर्‍हाडीने डोक्यात आणि मानेवर घाव घालून खून केला आहे.

आरोपी अमोल भुजबळ हा गुन्हा केल्यानंतर फरार झाला असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुनघोडे पाटील यांनी सांगितले असून प्रथमदर्शनी प्रॉपर्टीच्या वादा मधून हा गुन्हा घडला असल्याचे समजते…⭕

anews Banner

Leave A Comment