• Home
  • आता देखरेख खर्च.. मार्केट यार्डत आकारण्यात येणार

आता देखरेख खर्च.. मार्केट यार्डत आकारण्यात येणार

🛑 आता देखरेख खर्च.. मार्केट यार्डत आकारण्यात येणार! 🛑
✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

मार्केट यार्ड (पुणे):⭕बाजार समिती आवारात खरेदीवर देखरेख खर्च आकारला जातो. सर्वोच्च न्यायालयाने देखरेख खर्च आकारू नये असा आदेश दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पणन विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीला कराव्यात, या मागणीचे निवेदन दि पुना मर्चंटस चेंबरने पणन संचालकांना दिले असल्याची माहिती अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली.

बाजार समितीच्या गुलटेकडी येथील मार्केट यार्डात नियमित शेती मालाच्या खरेदीवर प्रत्येक शंभर रुपयामागे 5 पैसे देखरेख खर्च आकारला जात आहे.
हा खर्च खरेदीवर आकारला जातो त्यामुळे वर्षभरात याची रक्कम मोठी होत असते. तसेच शासनाने नियुक्त केलेला निरीक्षक (सुपवाईझर) नेमलेला नसेल, तर अशा ठिकाणी व्यापाऱ्यांनी देखरेख शुल्क भरण्याची गरज नाही, असा आदेश 5 नोव्हेंबर 2014 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता.

त्यानंतर या निर्णया विरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश करत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या पार्श्‍वभूमीवर देखरेख खर्च न आकारण्याबाबत मागणी केल्याचे पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले…⭕

anews Banner

Leave A Comment