• Home
  • *पाकिस्तान ८० हजार गाढव चीनला पाठवणार*

*पाकिस्तान ८० हजार गाढव चीनला पाठवणार*

🛑 पाकिस्तान ८० हजार गाढव चीनला पाठवणार 🛑
✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

विदेश :⭕
कराची : आर्थिक सर्वेक्षणानुसार पाकिस्तानात गाढवांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.पाकिस्तान सरकारचे आर्थिक सल्लागार अब्दुल हफिज शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० मध्ये देशातील गाढवांची संख्येत १ लाखांची वाढ झाली. या वाढीनंतर पाकिस्तानातील गाढवांची एकूण संख्या ५५ लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

गाढवां सदर्भात पाकिस्तान आणि चीन यांच्यात एक करार झाला आहे. या करारानुसार पाकिस्तान दरवर्षी ८० हजार गाढवांची रवानगी चीनला करतो. चीनमध्ये त्याचा वापर मांसासाठी तसेच अन्य बाबींसाठी केला जातो. तसेच गाढवांच्या कातडीचाही उपयोग चीनमध्ये करण्यात येतो. त्यांच्या कातडीपासून मिळालेल्या जिलेटिनपासून विविध प्रकारची औषधे ही तयार केली जातात.

चीनच्या काही कंपन्यांनी पाकिस्तानातील गाढवांच्या व्यापारात लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. गाढवांची संख्या अधिक असलेला पाकिस्तान जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे..⭕

anews Banner

Leave A Comment