Home भंडारा वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

47
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231015-061328_WhatsApp.jpg

वाढदिवसाचा खर्च टाळत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) :–वाढदिवसाचा खर्च नाहकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होवू शकतात. हा उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून तुमसर नगर पालिकेचे उपमुख्यधिकारी म्हणून कार्यरत असलेले सुनील साळुंके यांनी त्यांच्या पत्नी स्नेहल साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त तुमसर येथील नगर परिषदेच्या चिंतामण बिसने शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खावू वाटप केले.
शनिवारी (ता.१४) सुनील साळुंखे यांनी त्यांच्या पत्नीचा वाढदिवसानिमित्त नगर परिषद चिंतामण बिसने शाळेतील ४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.त्यामध्ये ड्रॉईंग बुक,कलर,लिखाण पॅड व इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी सुशांत आरु, अश्विनी आरु, निखिल बंड, किरण बंड, पूजा सावके,गजबे शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here