Home नाशिक नाशिकमध्ये अवैध शस्त्रास्त्रे बाळगणा-यांना अटक

नाशिकमध्ये अवैध शस्त्रास्त्रे बाळगणा-यांना अटक

78
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231013-075258_WhatsApp.jpg

इम्तियाज अत्तार नाशिक रोड (प्रतिनिधी )
नाशिक शहर हद्दीमध्ये अवैध हत्यार बाळगणारे आणि दहशत माजविणारे गुन्हेगार ताब्यात घेण्यात आले
दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने बेकायदेशीर रीतीने कोयता आणि चाकू दाखवून दहशत निर्माण करणारे पंचवटी पोलीस रेकॉर्ड वरील गुन्हेगार नाव १) प्रविण उर्फ बादल पवन वाघ (वय २३) रा.उदय कॉलनी पोटींदे चाळ क्रांतीनंतर मखमलाबाद रोड नाशिक आणि २) अक्षय विरसिंग वाघेरे (वय २३) रा.उदय कॉलनी पोटींदे चाळ क्रांतीनंतर मखमलाबाद रोड नाशिक हे दोघे जण गोदापार्क चिंचबन पंचवटी नाशिक येथे हातात धारदार कोयता आणि चाकू घेऊन दहशत निर्माण करत आहे ही माहिती गुप्तचर यंत्रणा मार्फत मिळाली असता पोलिसांनी तात्काळ दखल घेत सापळा रचून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले
नाशिक आयुक्त कार्यालयातील शस्त्र‌ बंदी मनाई‌ आदेश आणि हद्दपार आदेशाचे भंग केल्याने यांच्या वर पंचवटी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कामगिरी अंकुश शिंदे पोलिस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलिस उपायुक्त (गुन्हे) नाशिक शहर, सिताराम कोल्हे सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व शस्त्र विरोधी पथकातील सपोनी किरण रोंधळे आणि आदी पोलिस उपस्थित होते.

Previous articleव्यवस्था बदलासाठी राज्यकर्ताना विधिमंडळ अधिवेशनापर्यंत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात; नाहीतर रस्त्यावर उतरू.
Next articleमराठी शाळा टिकविणे काळाची गरज
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here