Home वाशिम एकविसाव्या वर्षी सलग अकराव्यांदा स्वेच्छा रक्तदानाचा युवकाचा सामाजीक आदर्श

एकविसाव्या वर्षी सलग अकराव्यांदा स्वेच्छा रक्तदानाचा युवकाचा सामाजीक आदर्श

113
0

आशाताई बच्छाव

IMG-20231012-WA0002.jpg

एकविसाव्या वर्षी सलग अकराव्यांदा स्वेच्छा रक्तदानाचा युवकाचा सामाजीक आदर्श

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)– आजचा युवक मोबाईल गेम, व्यसन आणि समाज माध्यमांमध्ये हरवला आहे अशा कितीही हाकाट्या पिटल्या तरी डिजीटल वादळामध्येही युवकांनी मेंदु जाग्यावर ठेवून समाजाचा ‘जागल्या’ म्हणून आपली क्रिएटीव्हीटी पणाला लावून इतरांपुढे आदर्श ठेवला असल्याची उदाहरणे समाजात जागोजागी आढळून येत आहेत. यातीलच एक उदाहरण म्हणजे लहानपणी आजारामध्ये स्वत:ला रक्तदान केलेल्या त्या अज्ञात रक्तदात्याचे सामाजीक ऋण लक्षात ठेवून वैभव पिंपळकर या विद्यार्थीदशेत असलेल्या युवकाने बुधवार, ११ ऑटोंबर रोजी २१ व्या वर्षी शासकीय रुग्णालयात अकराव्यांदा स्वेच्छा रक्तदान करुन आजीवन रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे.
वैभव हा पत्रकार संदीप पिंपळकर यांचा सुपुत्र असून तो अमरावती येथे आयटी कॉम्प्युटच्या प्रथम वर्षात शिकत आहे. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्याने स्वेच्छामनाने सुरु केलेली ही रक्तदानाची चळवळ वयाच्या २१ व्या वर्षीही सुरु ठेवली आहे. तीन महिने झाले की तो तडक उठतो आणि शासकीय रुग्णालयात जावून आपले ऐच्छिक रक्तदान करतो. याचा त्याने कुठेही गाजावाजा किंंवा प्रसिध्दी केली नाही. मात्र आपली सामाजीक जबाबदारी ओळखून त्याच्या ‘एकला चलो रे’ च्या संकल्पाचे त्याचा परिवार आणि मित्रमंडळींकडून कौतूक होत आहे. वैभवच्या रक्तदानाचा आदर्श घेवून त्याचे अनेक मित्रही स्वेच्छा रक्तदानाचा हा गोवर्धन पर्वत आपल्या खांद्यावर उचलण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अर्थातच रक्तदानाच्या या पवित्र आणि ऐच्छिक कार्यामागे आपण आपल्या रक्तदानाने इतरांचा जीव वाचवू शकतो ही भावना मनाला अमृतमय समाधान देणारी आणि स्वत:ला देवत्वाकडे नेणारी असल्याचे मत वैभवने व्यत केले असून तातडीच्या प्रसंगी रुग्णांना मदत मिळावी यासाठी युवकांनी आपले ऐच्छिक रक्तदान करुन या राष्ट्रीय कार्यात आपली सामाजीक जबाबदारी उचलावी असेही आवाहन केले आहे.

Previous articleमालेगांव पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यां विरोधात ९ नोव्हेंबर पासून एल्गार…!
Next articleदेगलूरचे युवा नेते धनाजी जोशी यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here