Home नांदेड भव्य मातंग परिषदेत मुखेड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे… नारायण गायकवाड.

भव्य मातंग परिषदेत मुखेड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे… नारायण गायकवाड.

53
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook-removebg-preview.png

भव्य मातंग परिषदेत मुखेड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे… नारायण गायकवाड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड -साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मुखेड येथील जिल्हा परिषद मुलींचे हायस्कूल मैदानात दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भव्य मातंग परिषदेचं आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांचा लावणीचा कार्यक्रम तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिनेस्टार साजन बेंद्रे यांचा गीतांचा कार्यक्रम तसेच माजी मंत्री प्रा . लक्ष्मणराव ढोबळे आणि जेष्ठ विचारवंत साहित्यिक शंकर भाऊ तडाखे
व्याख्यानाचा यांचा कार्यक्रम होणार आहे तरी मुखेड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या उपस्थित कार्यक्रमाला राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा समाजभूषण नारायण गायकवाड यांनी केले आहे . दिनांक २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नरसी रोड वर अण्णा भाऊ साठे चौक येथे सर्व समाज बांधवांनी जमा होऊन तेथून शहरातील मुख्य रस्त्याने कार्यक्रम स्थळाच्या दिशेने पायी चालत जायचे आहे आणि भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून सर्वांनी कार्यक्रम स्थळी पोहचायचे आहे असेही या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नारायण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत . भव्य मातंग परिषद कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार असून आ . डॉ . तुषार राठोड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे व माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड आणि प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेडचे आ . नामदेव ससाने , भंडाराचे मा . आ . नरेंद्र भोंडेकर , उदगीरचे मा . आ . सुधाकर भालेराव , भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मारोती वाडेकर , किसान सेना जिल्हाप्रमुख शंकर पाटील लुट्टे , भाजपा अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर कावडे व कंधारचे माजी पंचायत समिती सभापती पंडित देवकांबळे हे उपस्थित राहणार आहेत .

साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त मुखेड शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल येथे भव्य मातंग परिषदनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुखेड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे . पंकज गायकवाड

Previous articleसांगवी येथील इंदीरा गांधी रुग्णालयात भारतरत्न संत मदर तेरेसा जयंती उत्साहात साजरी
Next articleबँक ऑफ इंडिया हि देशातील अग्रगण्य बँक बनविण्याचे ध्येय जोपसा : शामकांत हुटा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here