Home अमरावती फिशरीज हब ची निविदा उघडण्यामागे कोणाचा दबाव: माझी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख...

फिशरीज हब ची निविदा उघडण्यामागे कोणाचा दबाव: माझी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा सवाल.

120
0

आंशुराज पाटिल मुख्य कार्यालय

IMG-20231006-WA0035.jpg

फिशरीज हब ची निविदा उघडण्यामागे कोणाचा दबाव: माझी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा सवाल.
—————————–
युवा मराठा वृत्तसेवा.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
पी.एन.देशमुख.
अमरावती.
जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण पश्चिम विदर्भातील गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमार, कोळी, भोई समाज बांधवाकर्ता अत्यंत महत्वकांशी ठरेल अशा फिशरी हबव फिश मार्केट प्रकल्पाच्या कोल्ड स्टोरेज ज आणि आईस प्लांटची यांत्रिका कामाची निविदा उघडण्याची तारीख उलटून दोन महिन्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे. परंतु महानगरपालिका प्रशासनाने अद्यापही निविदा उघडून पुढची प्रक्रिया पूर्ण केली नाही महोत्सव धोंड मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी सदर निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्याचा आवाज सादर करण्याचे आदेशित केलेल्या असताना सुद्धा मनपा हालायला तयार नाही. त्यामुळे त्या पत्राला सुद्धा केराची टोपली दाखवणार काय ? असा संतप्त सवाल माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. त्यांच्या मते सदर निविदा प्रक्रिया कोणाच्यातरी दबावामुळे अद्यापही उघडण्यात आलेले नाही. म्हणूनच यामागे नेमके काय गोड बंगाल आहे, याचीही विचारणा त्यांनी केली आहे. त फिशरीज हॅप्पी प्रक्रिया सन२०१८ साले सुरू झाली. या प्रकल्पाला महानगरपालिका प्रशासनाने गेल्या एक वर्षापासून अडवुन ठेवले आहे. प्रशासनाचे वेळा काढू धोरणच हा प्रकल्प सुरू होण्यास लागणाऱ्या अधिक विलंबास कारणीभूत आहे. स्थानिक मच्छिमार बांधवांच्या उत्पादित माशांना प्रक्रिया करून त्याची साठवण क्षमता वाढवून त्याचे मूल्यवर्धन करण्याच्या व त्याच्या उत्पन्नात भर घालण्यात या दृष्टीने वर्ष २०१८ मध्ये डॉ. सुनील देशमुख यांनी यासाठी 22 कोटी रुपयांचा शासन निधी मंजूर करून घेतली. त्याकरिता नूडल एजन्सी म्हणून अमरावती महानगरपालिकेची नियुक्ती करण्यात येऊन प्रकल्पाच्या निर्मितीची जबाबदारी मनपावर देण्यात आली होती. यामध्ये बडनेरा येथे फिशरिज हब हा मासे प्रक्रिया प्रकल्प, कोल्ड स्टोरेज आणि शुक्रवार बाजार व सोमवार बाजार बडनेरा येथे अद्यावत फिश मार्केट निर्माण करणे अशा प्रकल्पाचा आवकाहोता. परंतु गेल्या पाच वर्षात केवळ बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. आता पुढील प्रक्रिया पूर्ण करा, असा मस्यधोग विभागाचा आदेश असतानाही मनपाने हा प्रकल्प थांबून ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here