Home Breaking News उद्धव ठाकरे सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची अडीच वर्षात काळजी घेतली तशी काळजी...

उद्धव ठाकरे सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची अडीच वर्षात काळजी घेतली तशी काळजी घेणार सरकार आता नाही – प्रा -नितीन बानगुडे पाटील.

74
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20231006-WA0073.jpg

उद्धव ठाकरे सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची अडीच वर्षात काळजी घेतली तशी काळजी घेणार सरकार आता नाही – प्रा -नितीन बानगुडे पाटील.

(युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र  जिल्हा  ब्युरो चीफ बुलढाणा ज्ञानेश्वर पाटील दांदळे)
संग्रामपूर – ज्यावेळी उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतून सरसकट विनाअट विनाशर्त शेतकऱ्यांना दोन लाखाचा कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं काम त्यांनी केलं .इतिहासातील पहिली योजना आहे ज्यामध्ये दोन लाखापर्यंत विनाअट विनाशर्त शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली त्याचबरोबर नियमित कर्ज जे भरत आहेत त्यांना पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान त्यावेळी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी घोषित केलं मात्र दुर्दैवाने सरकार कोसळले पण नंतर आलेल्या सरकारने ते प्रोत्साहन पर अनुदान अद्याप पर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं नाही हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे सद्यस्थितीत विदर्भात अशी वस्तुस्थिती आहे की सरासरी दहा ते बारा शेतकरी दररोज आत्महत्या करतात आणि सर्वेक्षण असं सांगते की एक लाख शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत अशावेळी सरकारने त्यांना दिलासा दिला पाहिजे आधार दिला पाहिजे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला पाहिजे पण दुर्दैवाने तसं काही घडत नाही .नुकतेच शासनाने तेरा हजार शाळा ज्या शाळांची पटसंख्या विस च्या आत आहे त्या शाळा बंद करण्याचा निर्णय आता जाहीर केला आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरांनी शिकूच नाही कि काय अशी अवस्था या सरकारने केली आहे त्यामुळे शासन गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट आखत असल्याची टीका शिवसेना उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी केली .संग्रामपूर येथे ५ ऑक्टोबर रोजी होऊ द्या चर्चा हा कार्यक्रम तहसील कार्यालयासमोर पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी नितीन बानगुडे पाटील यांनी भाजप शिंदे गटावर चौफेर टीका केली
यावेळी शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी सुद्धा शासनाच्या बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड केला
यावेळी दत्तात्रय पाटील सह संपर्कप्रमुख, वसंतराव भोजने शिवसेना जिल्हाप्रमुख , तुकाराम काळपांडे जिल्हाउपप्रमुख , भीमराव पाटील विधानसभा संघटक, युवा सेनेचे रवींद्र भोजने, अमोल मोदे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमासाठी रवींद्र झाडोकार तालुका प्रमुख, अमोल ठाकरे किसान सेना तालुकाप्रमुख, शुभम घाटे शहर प्रमुख विजय मारोडे ,उपताप्रमुख कैलास कडाळे उपताप्रमुख, जनार्दन कुरवाडे , प्रल्हाद अस्वार , रामदास मोहे ,जगन्नाथ मिसाळ, पंकज मिसाळ, धनंजय अ वचार,भैय्या घिवे, प्रशांत इंगळे, वैभव मानकर ,आदी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल मेटांगे यांनी केले.

Previous articleपान टपरी वाले युवकांनी वाचविले दुचाकी चालकाचे प्राण
Next articleवरवट बकाल येथील अतिक्रमणधारकांचा साखळी” उपोषणाचा इशारा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here