Home माझं गाव माझं गा-हाणं ताहराबाद येथे कोरोना विलगीकरण कक्ष स्थापना

ताहराबाद येथे कोरोना विलगीकरण कक्ष स्थापना

175
0

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा,(जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                     बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायतीच्या वतीने येथील न्यू होरिझोन इंग्लिश स्कूलमध्ये कोरोना रुग्णासाठी विलिगिकरण केंद्र तयार करण्यात आले असून,या केंद्रात पुरुष,महिला यांच्यासाठी स्वतंत्र विलीगिकरण कक्ष उभारण्यात आली असून,याठिकाणी सर्व आवश्यक सुविधा ग्रामपंचायत रुग्णांना पुरविणार आहे.
बागलाणचे आमदार दिलीप बोरसे,प्रांत विजयकुमार भांगरे,गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, वैद्यकीय अधिकारी संजीवनी नंदन यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली.यावेळी उपसरपंच सीताराम साळवे, प्रदीप कांकरिया, डॉ प्रशांत सोनवणे, सचिन कोठावदे, तात्याभाऊ कासारे, मोठाभाऊ मानकर, निखिल कासारे,मुरलीधर वनिस,राजेश माळी,जीवन माळी,अजय सोनवणे,कुणाल नंदन,देविदास घोडके,राजेंद्र साळवे,मुकेश साळवे ,हेमंत नंदन,वैभव नंदन,मिलिंद चित्ते,विशाल सावंत ग्रामविकास अधिकारी सप्नील ठोके व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची कोरोना रुग्ण विलिगीकरनासाठी निवड करण्यात आली होती मात्र शाळेजवळ ग्रामस्थांचे वास्तव्य असल्याने यात बदल करून सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या न्यू होरिझन इंग्लिश स्कूलमध्ये ग्रामपंचयतीतर्फे आता कोरोणा रुग्णासाठी विलिगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. सरपंच सौ शीतल नंदन यांचे पती योगेश नंदन व दिर अरुण नंदन यांनी आपल्या मालकीची न्यू होरीझन शाळा गावात कोरोना रुग्ण रोज वाढत असल्याने गावाच्या हितासाठी आपली शाळा तत्काळ विलिगीकरण कक्ष निर्मिती साठी उपलब्ध करून दिली.याठिकाणी सुरवातीस वीस रुग्ण विलीगीकरन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.रुग्ण संख्या वाढल्यास वाढीव उपाययोजना करण्यात येणार आहे.रुग्णांना रोजचे दोन वेळेचे जेवण,नाश्ता,चहा,गरम पाणी,दूध हळद,पौष्टिक फळे पुरविण्यात येणार आहे.

कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष निर्मिती सोबत ग्रामस्थांनी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
आमदार दिलीप बोरसे

ताहाराबाद गावातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत सर्वोतोपरी प्रयत्नशील असून,ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे.
स्वप्नील ठोके
ग्रामविकास अधिकारी

Previous articleदेगलूर तालुक्यातील मौजे लींगणकेरुर येथे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता गावामध्ये सॅनिटायझरची फवारणी ..
Next articleबीड जिल्ह्याचे किसान पुत्र श्रीकांत गदळे यांनी केली कोरोनाविषयी जनजागृती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here