Home Breaking News 🛑 खूशखबर! या तारखेपासून सुरू होणार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, पाहा काय आहेत...

🛑 खूशखबर! या तारखेपासून सुरू होणार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, पाहा काय आहेत नियम… 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

109
0

🛑 खूशखबर! या तारखेपासून सुरू होणार हॉटेल्स आणि रेस्टॉरंट, पाहा काय आहेत नियम… 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 7 जुलै : ⭕ दिवसेंदिवस राज्य अनलॉक होत आहे. राज्यात लागू केलेले अनेक अटी आणि नियम शिथिल केले जात आहेत. त्यामुळे शहरातले अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. अनेक लोक आपल्या कार्यालयात कामासाठी जात आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर नागरिकांची गर्दीदेखील पाहायला मिळत आहे, मात्र याच्यातच अनेक हॉटेल्स व्यवसाईकांसाठी एक खुशखबर असणार आहे, ती म्हणजे येत्या 8 जुलैपासून ज्या हॉटेल्समध्ये राहाण्याची व्यवस्था आहे, त्या हॉटेल्समध्ये एकुण क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना राहाण्याची परवाणगी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल व्यवसाईकांनी सरकारकडे मागणी केली होती. त्या मागणीला उत्तर देताना सरकारने काही नियम आणि अटींच्या अधीन राहून हॉटेल्स आणि त्या हॉटेलमध्ये राहाणाऱ्या ग्राहकांना जेवनाची व्यवस्था म्हणून रेस्टॉरंटही चालू करण्याचे आदेश राज्य सरकारकडून दिले आहेत.

काय असतील नियम :-
➡️ हॉटेलच्या एकूण क्षमतेच्या 33 टक्के ग्राहकांना असणार परवाणगी.
➡️ राहाणाऱ्या ग्राहकांसाठी जेवनाची सोय म्हणून तिथले रेस्टॉरंट सुरू करण्याची दिली परवाणगी.
➡️ आलेल्या ग्रहकांची थर्मामीटरने तपासणी करणे
रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणे सक्तीचे.
➡️ हॉटेल्स जरी सुरू असले तरी तिथले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम बंदच असतील.
➡️ नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्सधारकांची परवाणगी रद्द होण्याचे दिले संकेत. ⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here