Home अमरावती मेळघाटात भंगार बसेसच्या धुमाकूळ काही थांबेना,चालकाचा प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला

मेळघाटात भंगार बसेसच्या धुमाकूळ काही थांबेना,चालकाचा प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला

85
0

आशाताई बच्छाव

IMG-20231005-WA0051.jpg

मेळघाटात भंगार बसेसच्या धुमाकूळ काही थांबेना,चालकाचा प्रयत्नाने मोठा अनर्थ टळला

मेळघाटात आजही मोठे शासनाचे दुर्लक्ष

चिखलदरा:प्रतिनिधी
नागेश धोत्रे
मेळघाट ब्यूरो चीफ

मेळघाटात दळणवळणाचे साधन कमी आहे.मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यातील लोकांना दळणवळणाचे एक मात्र शासकीय साधन महामंडळ बस आहे.परंतु महामंडळ बसची मेळघाटात दयनीय अवस्था झाली आहे. महामंडळ बस कोठेही किंवा कोणत्याही क्षणी बंद पडत आहे.अशीच एक ताजी घटना शासकीय आश्रम शाळा टेम्ब्रूसोडा जवळ घडली आहे.शासकीय कन्या आश्रम शाळेतील विद्याथीनींना घेऊन जाणाऱ्या बसचा घाटातच गियर तुडल्याने चालू बस काही मीटर अंतर कापून मागे गेली,परंतु ती शेतातातील झुडपात अडकल्याने मोठा अनर्थ टळला दरम्यान दोन मुलींनी बस मधून उड्या घेतल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या.परतवाडा आगरातून आगरातून मानव विकास या योजनेची बस परतवाडा वरून परसापुर, बोराला,मोरगड,टेम्ब्रूसोडा,जामली,वस्तापुर, देवगाव व परतवाडा,अशा रोज सकाळी शाळा सुरु होण्यापूर्वी व शाळा संपल्यावर विद्यार्थ्यांना घेऊन प्रवास करते.परंतु टेम्ब्रूसोडा वरून जामलीकडे शाळेतील ५०विद्यार्थ्यांना घेऊन येत असतांना एम एच ४० एन ८०६५ क्रमांकाचा बसचा घाटातच गियर तुटला त्यामुळे ही बस दोनशे मीटर मागे गेली.यात काहीनी मुलींना बुसमधून उड्या टाकायला सांगितले व दोन मुलींनी चालत्या बसमधून उड्या टाकल्या यात त्या मुली किरकोळ जखमी झाल्या सुदैवाने काही जीवितहानी झाली नाही.मेळघाटात चालणाऱ्या एसटी बसेस ची अवस्था अतिशय भंगार झाली असून रोज काही ना काही अपघात घडतात.भंगार झालेल्या बसेस घाटात पाठविले जातात.थोडक्यात अनर्थ टळला म्हणून बरे नाहीतर आज मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले असते.आतातरी आगार डेपो परतवाडा वरून मेळघाटाकरीता चांगली बस पाठवावी.मेळघाटात घाट वळणाचे रस्ते असल्याने भंगार बस कोठेही खराब होऊ शकते.मेळघाटात चांगली बस सेवा मिळावी करिता अनेक लोकप्रतिनिधींनी निवेदन दिले आहेत. परंतु त्या निवेदनाचा काही उपयोग दिसून येत नाही.मेळघाटातील भंगार बसेसची परिस्थिती जैसी थी, वैशी दिसून येत आहे.एसटी महामंडळाने भंगार बसेस वर लगाम लावून चांगल्या बस मेळघाटातील नागरिकांना उपलब्ध करून दयावे.अशी नागरिकांची मागणी आहे.

Previous articleमालेगाव पंचायत समितीत मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम उत्साहात; पण कलशाचीच अवहेलना !
Next articleभाविकांची साडेसाती घालवणाऱ्या शनि महाराजांच्या शनिशिंगणापूर रस्त्याला लागली प्रशासनाची साडेसाती.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here