• Home
  • भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही ! कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही ! कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला

⭕भारत आमची जागा कधीच घेऊ शकत नाही !
कंपन्या बाहेर पडल्यामुळे चीन मोदींवर भडकला ⭕

( विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
बीजिंगः जगातील बहुतेक देशांची अर्थव्यवस्था कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे कोलमडली आहे. दिवसेंदिवस रसातळाला जाणारी अर्थव्यवस्था पाहता भारतही औद्योगिक प्रगती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. उद्योगविश्वात चीनला मागे टाकत ते स्थान मिळवण्याचा भारताचा मानस आहे. त्यावरूनच चीननं आता भारतावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्समधून भारताच्या अशा प्रयत्नांवर चीननं टीका केली आहे. चीनमधील अनेक कंपन्या आता भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू करण्याच्या विचारात आहेत, ज्याने भारताच्या शेजारचा देश असलेला चीन बिथरला आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने भारताच्या अशा प्रयत्नांवर चिंता व्यक्त केली आहे. भारत कधीही चीनला पर्याय बनू शकत नाही, असाही त्यात उल्लेख केला आहे. अलीकडेच एका जर्मन शू कंपनीने आपले उत्पादन युनिट चीनमधून भारतातल्या उत्तर प्रदेशमध्ये हलविण्यात येणार असल्याचे सांगितले. तेव्हापासून चीनची चिंता वाढली आहे. त्याचप्रमाणे इतरही अनेक कंपन्या भारतात येण्यास उत्सुक आहेत. याशिवाय अनेक कंपन्या चीनबाहेर जाण्याचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशने चीनमधील अशा मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आर्थिक टास्क फोर्सची स्थापना केली आहे
भारत कधीही यशस्वी होणार नाहीः ग्लोबल टाईम्स
एवढे प्रयत्न करूनही कोरोना साथीच्या काळात आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर चीनला मागे ठेवून भारत जगातील उद्योगविश्वाचा कारखाना होण्याची शक्यता नाही. भारत चीनला मागे टाकण्याच्या मार्गावर आहे, पण ही फक्त देशाप्रति असलेली काही लोकांची विचारसरणी आहे. तो राष्ट्राभिमान आहे, बाकी काही नाही. अशा अभिमानाने आर्थिक बाबींच्या पलीकडे जाऊन आपण सैन्य स्तरापर्यंत पोहोचलो आहोत. ज्यामुळे काही लोकांना वाटतं की आता ते चीनच्या सीमेवरील प्रश्न चुटकीसरशी सोडवतील. चीनचा सामना करू शकतील. असे विचार भारतासाठी निःसंशयपणे धोकादायक आणि दिशाभूल करणारे आहेत.
आतापर्यंत चीनच्या सीमा संरक्षण दलांनी सीमा नियंत्रण उपायांना चालना दिली आहे. गॅल्वान व्हॅली भागातील सीमा नियंत्रण परिस्थितीत एकतर्फी बदल करण्याच्या भारताच्या नुकत्याच केलेल्या प्रयत्नाला उत्तर देताना आवश्यक ती पावले उचलली गेली आहेत, असंही या चिनी वृत्तपत्रात लिहिलेलं आहे. चिनी वृत्तपत्र लिहितो की, पाश्चिमात्य माध्यमांनीही यावेळी चीनच्या बाजाराच्या संभाव्यतेची तुलना करून भारताची स्पर्धात्मकता वाढविण्याचा उत्साह दाखविला आहे, ज्यामुळे काही भारतीय वास्तविक परिस्थितीपासून संभ्रमित झाले आहेत. सध्या भारत चीनची जागा घेईल, असा विचारदेखील अकल्पनीय आहे.
चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे भारताला औद्योगिक स्तरावर आकर्षित करण्याची संधी मिळेल असे वाटते, पण दक्षिण आशियाई देशांमध्ये त्यांच्या निकृष्ट पायाभूत सुविधांची कमतरता, कुशल कामगार नसणे आणि परकीय गुंतवणुकीच्या कठोर बंधनामुळे अशी संधी मिळणं अवघडच आहे.  भारत पुढील जागतिक कारखाना होण्याचे स्वप्न पाहत आहे आणि मोदी सरकारनेही ‘मेक इन इंडिया’ मोहिमेसारख्या उद्दिष्टांसाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत, ज्याचा जगावर फारसा परिणाम होऊ शकला नाही. भौगोलिक राजनैतिक पद्धतींमध्ये ड्रॅगन आणि आशियातील हत्ती यांच्यातील लढाई वेगाने विकसित होत आहे, परंतु दोन प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठा एकत्र येण्याचा मार्ग शोधू शकतील आणि या प्रक्रियेदरम्यान, व्यावहारिकतेसह भारतीय अर्थव्यवस्थेने त्याबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक असल्याचाही सल्ला ग्लोबल टाइम्सनं दिला आहे.

anews Banner

⭕पाकिस्तानातून आलेल्या टोळ कीटकांची देशात दहशत!⭕ ( विजय पवार ब्यूरो चीफ युवा मराठा न्युज ) कोरोनाच्या या संकटात राजस्थान, पंजाब आणि गुजरात नंतर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा आणि छत्तीगडमधील शेतकरी तसेच सामान्य लोकांच्या टोळ कीटकांमुळे समस्या वाढल्या आहेत. टोळ कीटक हा एक नाकतोड्याचाच प्रकार आहे. पाकिस्तानमार्गे टोळ किटकांची झुंड भारतात दाखल झाली आहे. हे टोळ किटक पिकांचे नुकसान करत आहेत. राजस्थानातील १८ आणि मध्य प्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करून ते मंगळवारी उत्तर प्रदेशांपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे या समस्यांना सामोर जाण्यासाठी पिकांवर कीटकनाशक फवारणी केली जात आहे. टोळ कीटकांवर करणार ‘सर्जिकल स्ट्राइक’ उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये प्रशासनाने देखरेख समिती नेमण्याबरोबरच टोळांच्या नाश करण्यासाठी कृषी सैन्य तयार केले आहे. ४५० ट्रॅक्टर माऊंटेड स्प्रेयर्स आणि रासायनिक उपकरणांनी सुसज्ज असणारी अ‍ॅग्री आर्मी रात्री टोळ कीटकांवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणार आहेत. जिल्हा कृषी अधिकारी डॉ सतीशचंद्र पाठक यांनी माहिती दिली की, टोळ कीटकांचा नाश करण्यासाठी ४५० ट्रॅक्टरच्या फवारण्या तयार केल्या आहेत. ४७०० लिटर किटकनाशकांचीही व्यवस्था केली आहे. खूप वेगाने दूरवर स्थलांतर करण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणात प्रजोत्पादन क्षमता असल्याने टोळांच्या प्रजातींपैकी वाळवंटीय टोळ ही प्रजाती महत्त्वाची मानली जाते. वाळवंटीय टोळ हे पश्‍चिम आफ्रिका आणि भारत यांच्यामधील वाळवंटीय प्रदेशात आढळतात. ते नाकतोड्यापेक्षा आकार आणि रंगाने वेगळे आहेत. तसेच योग्य वातावरणाची स्थिती मिळाल्यास मोठ्या संख्येने वाढतात. मुबलक पाऊस पडून हिरवळ विकसित होते, तेव्हा वाळवंटीय टोळांची संख्या वाढते. एक-दोन महिन्यात प्रौढ टोळ लाखोंच्या घरात एकत्र येऊन झुंड तयार करतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘एफएओ’च्या मते एका टोळझुंडीत सुमारे चार कोटी प्रौढ टोळ कीटक असतात जे एका दिवसांत ३५ हजार लोक किंवा दहा हत्ती किंवा २५ उंट यांना आवश्‍यक एवढे अन्न खाऊ शकतात. यावरून पिकांच्या होणाऱ्या नुकसानीची तीव्रता समजू शकते टोळधाडीचे नियंत्रण करण्यासाठी विविध पद्धती आहेत. त्यामध्ये ज्या ठिकाणी अंडी घातली असतील अशी ठिकाणे उकरणे, कीटकांना मारणे व जाळणे या पद्धतीचा वापर करता येतो. कीटकनाशक मिसळलेल्या भुकटीची धुरळणी आणि संहत व कमी प्रमाणात रासायनिक फवारणी या पद्धतीद्वारे काही प्रमाणात नियंत्रण करता येते.

By Yuva Maratha

Leave A Comment