Home जळगाव अस्तित्व संघटनेच्याच्या माध्यमातून सुरू असलेले “माहेर” कौटुंबिक हिंसाचार सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण व...

अस्तित्व संघटनेच्याच्या माध्यमातून सुरू असलेले “माहेर” कौटुंबिक हिंसाचार सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र महिलांकरिता हक्काचे व्यासपीठ

48
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231005-081058_WhatsApp.jpg

अस्तित्व संघटनेच्याच्या माध्यमातून सुरू असलेले “माहेर” कौटुंबिक हिंसाचार सल्ला, मार्गदर्शन प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र महिलांकरिता हक्काचे व्यासपीठ

”  नरेंद् पाटील, जळगांव.
ब्युरो चीफ
मलकापूर :- अस्तित्व संघटनेच्याच्या माध्यमातून सुरू असलेले “माहेर” कौटुंबिक हिंसाचार सल्ला,मार्गदर्शन प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र महिलांकरिता हक्काचे व्यासपीठ बनत असून या व्यासपीठाअंतर्गत अस्तित्व संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रेमलाताई सोनोने यांनी तब्बल ९५० प्रकरणे निकाली काढली असून त्यांच्या समुपदेशनामुळे या प्रकरणातील शेकडो संसार आजही सुखाने नांदत आहे.
गत १५ वर्षांपासून ‘अस्तित्व’ खाजगीरित्या महिलांसाठी मोफत समुपदेशन केंद्र चालवीत आहे. गेली १० वर्ष संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे तर आता मलकापूर येथे माहेर कौटुंबिक हिंसाचार, सल्ला व मार्गदर्शन प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र चालवीत आहे. येथे आठवड्यातील कोणत्याही दिवशी महिला हक्काने तक्रार घेऊन येऊ शकतात. त्यानंतर शनिवारला त्यांना समुपदेशनासाठी बोलावलं जातं. शनिवारलाच यासाठी की मलकापूरचा आठवडी बाजार असतो व बाजाराच्या दिवशी सर्वांना येणं सोयीचं होतं. त्यामुळे शनिवार हा दिवस समुपदेशनासाठी निवडला गेला. याच शनिवारच्या दिवशी आजपर्यंत तब्बल ९५० अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या केसेसला निकाली काढले गेले आहे. त्यातील शेकडो संसार आजही सुखाने नांदत आहेत. हीच अस्तित्व संघटनेचे खूप मोठी अचिव्हमेंन्ट आहे अस संघटनेच्या अध्यक्षा सौ प्रेमलाताई सोनोने यांचं स्पष्ट मत आहे. तर माहेर हे एक केंद्र नसून महिलांचे हक्काचे व्यासपीठ आहे. येथे गरजू महिलांना मोफत सल्ला, मार्गदर्शन, गरज असल्यास त्यांना औद्योगिक प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. त्याचप्रमाणे महिला वर्गाला शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून दिला जातो. यामध्ये विशेषत: व्यसनाधीन पतीच्या त्रासापासून पीडित महिला, कौटुंबिक हिंसाचार, विधवा- परित्यक्ता, घटस्फोटीत व एकल महिला, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिला किंवा मुलं, लैंगिक अत्याचारपीडिता, प्री मॅरेज कौन्सिलिंग अशा सर्वांना councling करण्यात येते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू परत मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. त्यामुळेच माहेर वर आज मीतीस सर्वसामान्य वर्ग विशेषत: महिलांचा वाढता विश्वास हीच खऱ्या अर्थी कामाची पावती असल्याचा मानस सौ. प्रेमलताताई सोनोने यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केला आहे.

Previous articleश्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या पुजा-यांना संस्थानच्या उत्पन्नातुन रक्कम देऊ नका
Next articleराजमाता जिजाऊ गणेशोत्सव मंडळाचा क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचा बक्षीस वितरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here