Home नाशिक श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या पुजा-यांना संस्थानच्या उत्पन्नातुन रक्कम देऊ नका

श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या पुजा-यांना संस्थानच्या उत्पन्नातुन रक्कम देऊ नका

238
0

आशाताई बच्छाव

IMG-20231004-WA0074.jpg

श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या पुजा-यांना संस्थानच्या उत्पन्नातुन रक्कम देऊ नका

जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या वतीने वारकरी महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील डुकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

जिल्ह्यातील शेकडो वारकरी भक्तांचा विरोध

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या उत्पन्नातुन पुजा-यांना चाळीस टक्के रक्कम देण्याचा विरोध जिल्ह्यातील समस्त वारकरी भक्तांनी केला आहे त्याप्रमाणे घटनेत तथा या पद्धतीत दुरुस्ती करणे अहवाल देणेबाबत मा.धर्मादाय उपआयुक्त सो.नाशिक विभाग नाशिक यांचे न्यायालयात केस दाखल केली असल्याने सदर केसेचा निकाल लागेपर्यंत आपण पुजा-यांना कुठल्याही प्रकारची रक्कम अदा करू नये याबाबतचा हारकत अर्ज अध्यक्ष-सचिव व संपुर्ण विश्वस्त मंडळ संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्था त्र्यबंकेश्वर यांना जिल्ह्यातील शेकडो वारकरी भक्तांच्या सहिंनिशी दिला आहे
या हरकत अर्जात वारकर्यांनी म्हटले आहे की आम्ही वारकरी साप्रंदायाचे असुन निवृत्तीनाथ महाराज समाधी स्थळाचे भक्त आहे निवृत्तीनाथ पुजारी कुंटुंबास संस्थानच्या उत्पनातुन 40 टक्के रक्कम घेतात आणि विश्वस्त मंडळास 60 टक्के अशी विभागणी केलेली आहे 60 टक्के मध्ये संस्थानचा संपुर्ण खर्च ,मंदिराची देखभाल,विविध उत्साहाचे आयोजन,कर्मचारी पगार,भक्त निवासाची देखभाल इ.संपुर्ण खर्च येतो विश्वस्त मंडळास 60 टक्केमध्ये संपुर्ण खर्च करून फारशी रक्कम शिल्लक राहात नाही त्यामुळे अद्याप पावेतो संस्थानचा विकास खुंटलेला आहे निव्वळ उत्पन्नातुन कुठलाही खर्च वजा न करता संस्थानकडे संस्थानकडे पुरेशी रक्कम शिल्लक रहात नसल्याने संस्थानला मंदिर परिसराचा विकास करणे व वारकर्यांना सुविधा देणे शक्य होत नसल्याचे वारक-यांच्या निदर्शनास आले आहे याविरोधात त्यांनी घटनेत तथा यापद्धतीत दुरूस्ती करणेबाबत मा.धर्मादाय उपआयुक्तसो.नाशिक यांचे न्यायालयात केस दाखल केलेली असल्याने या केसचा निकाल होईपर्यंत पुजा-यांना विश्वस्तांनी कुठलीही रक्कम अदा करू नये जर केली तर त्यास विश्वस्त मंडळ जबाबदार राहिल त्याचबरोबर जिल्ह्यातील समस्त वारकरी संप्रदायातील व निवृत्तीनाथ भक्तांनी कोणत्याही कागदपत्रांची शहानिशा केल्याशिवाय सही करू नये अशी विनंती व मागणी जिल्ह्यातील निवृत्तीनाथ संस्थान वारकऱ्यांच्या वतीने नाशिक जिल्हा वारकरी महामंडळाचे कार्याध्यक्ष दत्तात्रय डुकरे पाटील सारोळे खुर्द यांनी पत्रकार परिषदेत केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here