Home अमरावती म.न.पाअमरावतीतर्फे श्री अंबादेवी नवरात्री उत्‍सवात एकुण १५१ खुले प्‍लॉट इच्‍छुक व्‍यवसायीधारकांना व्‍यवसाय...

म.न.पाअमरावतीतर्फे श्री अंबादेवी नवरात्री उत्‍सवात एकुण १५१ खुले प्‍लॉट इच्‍छुक व्‍यवसायीधारकांना व्‍यवसाय करण्‍याकरीता वितरीत करण्‍यात येणार.

45
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231005-075410_WhatsApp.jpg

म.न.पाअमरावतीतर्फे
श्री अंबादेवी नवरात्री उत्‍सवात एकुण १५१ खुले प्‍लॉट इच्‍छुक व्‍यवसायीधारकांना व्‍यवसाय करण्‍याकरीता वितरीत करण्‍यात येणार.
—————————-
दैनिक युवा मराठा वृत्तसंकलन.
अमरावती.
विभागीय संपादक.
पी.एन.देशमुख.
अमरावती .
महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी संपन्‍न होणा-या श्री अंबादेवी नवरात्री उत्‍सव दरम्‍यान मंजुर नकाशा प्रमाणे राजकमल चौक ते गांधी चौक पर्यंत रस्‍त्‍याचे दुतर्फा एकुण १५१ खुले प्‍लॉट ५*७=३५ चौ.फूट जागा इच्‍छुक व्‍यवसायीधारकांना व्‍यवसाय करण्‍याकरीता वितरीत करण्‍यात येते. याकरीता इच्‍छुक व्‍यवसायीकांकडून शासकीय दर रुपये ५११०/- + १८% टक्‍के जि.एस.टी. सह जास्‍तीत जास्‍त दराचे ऑफर मुल्‍याचे कोटेशन निविदा मागविण्‍यात येत आहे.
सविस्‍तर माहितीसह विहीत नमुन्‍यातील निविदा प्रपत्र तसेच अटी व शर्ती रु.५००/- + १८ % जीएसटी रोखीने भरुन दिनांक ३/१०/२०२३ ते दिनांक ९/१०/२०२३ पर्यंत दुपारी ५.०० वाजेपर्यंत कोटेशन फॉर्म प्राप्‍त करता येईल. सिलबंद कोटेशन दिनांक १०/१०/२०२३ रोजी दुपारी ५.०० वाजेपर्यंत बाजार व परवाना विभाग या कार्यालयात दाखल करता येईल. तसेच दिनांक ११/१०/२०२३ रोजी दुपारी १२.०० वाजता मा.उपायुक्‍त (सा.) यांचे कार्यालयात उपस्थितांसमोर उघडण्‍यात येईल.
या संबंधीत अटी व शर्ती बाजार व परवाना विभाग, राजापेठ, महानगरपालिका हॉटेल, ग्रेस इन मागे, झोन क्र.२ पहिला माळा, अमरावती या कार्यालयात पाहावयास मिळतील किंवा महानगरपालिकेचे संकेत स्‍थळावर https://www.amravaticorporation.in वर माहिती उपलब्‍ध राहतील.
इच्‍छुकांनी विहीत प्रपत्रात आपली निविदा वर दिलेल्‍या मुदतीत वेळीच सादर करावी असे आवाहन बाजार व परवाना विभाग, महानगरपालिका, अमरावती यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here