Home पुणे अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील आरोपी ससूनमधून फरार, पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल, १० पोलिसांना...

अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील आरोपी ससूनमधून फरार, पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल, १० पोलिसांना दणका

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0098.jpg

अमली पदार्थाच्या गुन्ह्यातील आरोपी ससूनमधून फरार, पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल, १० पोलिसांना दणका

युवा मराठा न्युज पेपर अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

पुणे : ससून रुग्णालयात उपचार घेत असताना अमली पदार्थाचे रॅकेट चालविणारा आरोपी ललीत पाटील याने सोमवारी रात्री रुग्णालयातून पलायन केले होते. या घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतली आहे. तिथे ड्युटीवर कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई पोलीस आयुक्तांनी केली आहे.
यामध्ये ASI रमेश जर्नादन काळे, विशाल बाबुराव, स्वप्निल चिंतामन, दिगांबर विजय चंदन, पीएसआय मोहिनी डोंगरे, हवालदार आदेश सिताराम, नाथाराम भारत काळे, दत्तू बनसोडे, अमीत सुरेश जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे.

ससून रुग्णालयातून ललीत पाटी’ मली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवित असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एक किलो एमडीची तस्करी करताना त्याच्यासह दोघांवर शनिवारी कारवाई केली होती. या प्रकरणात ललीत पाटीलसह सुभाष जानकी मंडल (वय २९, रा. देहूरोड, मूळ रा. झारखंड) आणि रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता) यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, मंडल आणि शेख यांना अटक केली होती.

मात्र, पाटील हा दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी असून उपचार घेत असल्यामुळे त्याला न्यायालयाच्या परवानगीने अटक करावी लागत होती. पण, त्याच्या अगोदरच तो उपचार घेत असलेल्या ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ मधून सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास पसार झाला होता.

यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती मोठी शंका उपस्थित केली गेली होती. याच घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि तत्काळ संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

Previous articleगुरांचा गोठा भ्रष्टाचार प्रकरणात संग्रामपूर पंचायत समिती समोर राष्ट्रगीताने उपोषणाला सुरुवात!
Next articleटोम्पे महाविद्यालयात एक घंटा स्वच्छतेसाठी उपक्रम संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here