Home अमरावती टोम्पे महाविद्यालयात एक घंटा स्वच्छतेसाठी उपक्रम संपन्न

टोम्पे महाविद्यालयात एक घंटा स्वच्छतेसाठी उपक्रम संपन्न

43
0

आशाताई बच्छाव

IMG-20231003-WA0099.jpg

टोम्पे महाविद्यालयात एक घंटा स्वच्छतेसाठी उपक्रम संपन्न

मयुर खापरे तालुका प्रतिनिधी.
चांदूरबाजार येथील गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, गो.सी. टोम्पे ज्युनिअर कॉलेज, बी एड व एड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मा. प्रधानमंत्री यांच्या आव्हानानुसार स्वच्छताही सेवा या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला. यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके यांनी महात्मा गांधी व गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांना स्वच्छता हीच सेवा या संदर्भात स्वच्छतेचे महत्व पटवून सांगितले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण परिमल यांनीही विद्यार्थ्यांना गाडगे बाबा आणि महात्मा गांधी यांच्या कार्याची ओळख करून देवून विद्यार्थ्यांना स्वच्छता अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हातात खराटा, घमेले घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर व महाविद्यालयाच्या प्रांगणात एक घंटा श्रमदान केले. या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here