Home सामाजिक कायम शून्यात यायची तयारी ठेवा तहसीलदार गीतांजली गरड -मुळीक यांनी लिहिलेला लेख....

कायम शून्यात यायची तयारी ठेवा तहसीलदार गीतांजली गरड -मुळीक यांनी लिहिलेला लेख. … …

125
0

आशाताई बच्छाव

IMG-20230930-WA0051.jpg

कायम शून्यात यायची तयारी ठेवा तहसीलदार गीतांजली गरड -मुळीक यांनी लिहिलेला लेख. … … – ….. मयुर खापरे चांदुर बाजार. – _ दीपाली चव्हाण काय किंवा शीतल फाळके काय किंवा आत्महत्या करणारी कोणतीही व्यक्ती काय… अपेक्षाभंगाचे ओझे.. त्यातून आलेली भयाण निराशा.. स्वतःकडून झालेल्या किंवा न झालेल्या चुकांचे खापर इतरांनी फोडले असेल किंवा स्वतःच फोडून घ्यायची सवय, आयुष्यावरच आपले ओझे लादण्याची सवय याची गिचमिड करुन आयुष्याचा चोळामोळा करण्याचा हक्क ना निसर्गाने आपल्याला दिलाय ना कायद्याने दिलाय. आयुष्य तर आपल्याच गतीने आपल्याच पद्धतीने जात असतें लुडबुड करतो ती आपण स्वतःच… कसली लुडबुड करतो आपण आपल्याच आयुष्यात? .. कधी मागे वळून पाहिलंय का? मोठे झालो कि किमान शिकलेलो तरी असतोच,जगाचं थोडं व्यवहार ज्ञान आलेलं असतं, त्यात एखादी नोकरी, पद मिळालं, लग्न झालं कि मग बोलायलाच नको.. त्यातच एवढे गुरफटतो आपण कि जिथून सुरवात केलीय त्या जागेकडे बघायला एकतर आपल्याला फुरसत तर नसतेच.. आणि इच्छाही.. जेव्हा लहान होतो, आईबाबांच्या पदराखाली होतो तेव्हा कोण होतो आपण.. शून्य जेव्हा पाढे घोकत बसायचो, धडे गिरवायचो तेव्हा कोण होतो आपण शून्य. एखाद्या परीक्षेत नक्कीच मागे पडलेलो होतो, काही गुणांनी हरलेलो होतो तेव्हा पुन्हा शून्यावरच तर आलो होतो.. पुन्हा नव्याने सुरवात करायचो.. का तर शून्याची जागा त्यावेळी आपल्यापासून जवळ होती.. पुन्हा मागे जाऊन उमेदीचा नाव स्पोर्ट्स ड्रेस घालून सज्ज व्हायचो आपण..पण आता खूपच पुढे आलोय आपण, असे नाही का वाटतं तुम्हाला? दिपालीसारख्या मुली त्याच शून्यापासून खूप दूर गेल्या होत्या असं मला ठामपणे वाटतंय. जेव्हा जेव्हा आयुष्यात छोटी किंवा खूप मोठी भली मोठी संकट येतात,जेव्हा आपले नोकरीतील लोकं किंवा त्रास देणारे कोणतेही लोकं जेव्हा आपल्या मनाच्या आणि शरीराच्या भक्कमतेभोवती नैराश्याचा आणि अपयशाचा पाश घट्ट आवळायला सुरु करतात तेव्हा त्या पाशापुढे नांगी टाकायची, त्या नैराश्याला कवटाळायचं कि त्यातून सुटका करायची हे सुचण्याचे सारे मार्ग जेव्हा बंद होतात तेव्हा काय करायला हवे हे आधी आपल्या मनाला माहिती पाहिजे. न्हवे अश्यावेळी मी काय करेन याची मानसिक तयारी आधीपासूनच हवी.. मान्य आहे सर्वांनाच अशी तयारी जमेलच असं नाही. पण हेही तितकंच खरं असतं कि आपण आपला अभ्यास, आपलं शिक्षण, आपली पदवी, आपली नोकरी, आपलं पद प्रतिष्ठा, आपलं स्थान आपली समाजातील नातेवाइकांमधील प्रतिमा, त्यांचा आपल्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असेल याचा धसका, आपले सहकारी आपल्यामागे काय चर्चा करत असतील, समोर आपल्याला अपमानित करतील या आभासी गाठोड्यालाच कमरेला बांधून घेतलंय कि त्याला खाली उतारवायलाच तयार नसतो… काय आहे त्या गाठोड्यात.. फक्त आयुष्याला आभासी वर्तुळ बनवून त्यात गोलगोल गरागरा फिरवायला लावणारे भोवरे आहेत त्यात. हे समजून घ्या आधी. म्हंटलं तर आहे.. म्हंटलं तर काहीच नाही ते. . हे ओळखायला शिका. एखादी मोठी व्यक्ती normal बोलली, माधुरी, उर्मिला मराठीत बोलली कि आपण कौतुकाने बोलतो किती down to earth आहेत हे लोकं. मग आपणही down to earth का नाही राहत? का पुन्हा शून्यात नाही जात आपण? का त्याच नोकरीला, पदाला, स्थानाला कवटाळून बसण्याचा हट्ट धरतो? सोडायची मानसिकता ठेवा. निदान जेव्हा unlimited त्रास व्हायला सुरु होतो तेव्हा तरी.. भलीमोठी, सुंदर देखणी मेणबत्ती जेव्हा अग्नीच्या धगेने वितळते, तेव्हा जमिनीवर वितळून येते शांतपणे.. तसें शांतपणे जमिनीवर या.. मनाला ही खाली उतरू द्या. होणारा, झालेला आणि होऊ घातलेला त्रास, टॉर्चर जरी संपणारे नसले तरी त्याला गिळंकृत करुन त्याची धज्जी उडवण्यासाठी आपल्या काळजाची खोली मोट्ठी करावी लागेल त्यासाठीच जसा फुगा मोठा फुगला नाही कि आपण त्यातील हवा काढून घेतो,आपल्याला लागलेला दम शांत होऊ देतो, एक मोठ्ठा श्वास घेतो आणि पुन्हा नव्याने फुगा फुगवायला घेतो,तस्संच पुन्हा नव्याने सुरवात करण्याची ताकद नेहमी ठेवा. त्यासाठी आपल्या जवळच्या माणसांसोबत बोला, मित्र मैत्रिणींसोबत बोला.. खुपजण सांगताहेत व्यक्त व्हा.. बरोबर आहे व्यक्त व्हायला हवे पण त्यासाठी कोणी जवळ नसेल, व्यक्त होता येत नसेल तर भक्ती करा.. परमेश्वर एक संकल्पना आहे, देव आहे कि नाही माहिती नाही पण त्याच्या भक्तीत खूप ताकत असतें. तुम्हाला प्रत्येकवेळी व्यक्त नाही होता आलं तर एकटे राहून भक्ती करा…मंत्रोच्चारात भलीमोट्ठी ताकत आहे. म्हणून आधी म्हंटलं तस जेव्हा संकट येईल तेव्हाच भक्ती, धावा करू नका तर नेहमी जसे शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी व्यायाम कसरत करतो तसें मनाच्या आरोग्यासाठी भक्ती करा, मंत्रोच्चार करा त्यात रस नसेल तर मोठ्याने गाणी म्हणा, छंद जोपासा, मोट्ठ्याने रडा देखील,.. या गोष्टी आपण पदावर साम्राज्य करताना क्षुल्लक वाटतात आणि आपण त्यांना वेळ देत नाही, जोपासत नाही त्याची शरीराला आणि मनाला असलेली सवय राहत नाही.. आणि मग संकटांचा उद्रेक झाला कि या गोष्टींपासून दूर असल्यामुळे मनाला एकच पर्याय दिसतो तो ढिशक्यांवं.. शूट.. कारण दिपालीही व्यक्त झाली होतीच कि तिच्या घरच्यांसोबत.. पण आपण आपले रडगाणं कायमच गात राहत नाही.. आतल्याआत घुसमटत राहतो. स्वतःला एवढे दोष देतो, समोरच्यालाही देत राहतो आणि टोकाचा निर्णय घेतो. तो घेतलाच नाही पाहिजे पण मग काय करायला पाहिजे? आहे त्या पाशातून आधी स्वतःला मोकळे करा. नोकरीमुळे त्रास होतोय ना? मग नोकरी सोडा असे म्हणणार नाही मी, पण नोकरीला आयुष्यात जे अनन्यसाधारण महत्व देतोय आपण ते आधी खाली आणा.. जरा बघा आपल्या घरच्यांना त्यामुळे वेळ दिलेला नसतो आपण. एक सामान्य गृहिणीप्रमाणे शांत संयमी राहून काही दिवस नोकरीतून बाहेर पडा. स्वतःला आधी आपण खास कोणीतरी आहोत हे समजणे बंद करा. दीपाली च्या मानसिकतेत असाल तर आधी स्वतःला रितं करा.. समोरचा टॉर्चर करतोय, अपमान करतोय, खूप अडचणीत आणतोय, आयुष्य उध्वस्त करू पाहतोय, पण त्याच्या शब्दांना आपल्या भक्कमतेवर मात करू देऊ नका.. आपण सिनेमात पाहतो कि गुदमरलेल्या नायिकेला नायक एका डोंगरावर आणतो आणि तिला मोठ्याने किंचाळायला ओरडायला लावतो.. ज्याचा राग येतोय त्याला शिव्याशाप द्यायला लावतो.. आणि ती जेव्हा असे करते तेव्हाच तिला जाणवते कि आपल्या मनावरचे मोठे ओझे दूर झालेय. भले समस्या मिटलेली नाही पण मनावरचं स्वतःला संपवून टाकू इच्छिणार काळ मळभ दूर झालंय. आता नव्याने लढायची शक्ती तिला मिळालीय असे वाटू लागते तिला. आपण हे दृश्य screen वर मनापासून पाहतो, टाळ्या वाजवतो पण स्वतःही आपण हे केले पाहिजे हे त्या नेमक्या वेळी विसरतो. It works.. हे करुन बघा. छोटे छोटे फंडे आहेत तुटणाऱ्या, फाटणाऱ्या आयुष्याला जोडण्यासाठी.. बस.. नाउमेदीचा क्षण टाळा…. न्हवे टाळलेच पाहिजेत नाहीतर एकतर आपली दीपाली होईल नाहीतर ती गेल्या दिवसापासून संतापलेली, चरफडणारी आपल्यासाख्या स्त्रियांची लाट तयार होईल..म्हणून आता बस्स .. एवढेच सांगणे आहे कि आपल्या लाडक्या संभाजीमहाराजाला तुकडे तुकडे करुन मारल्यानंतर गड सोडून जाता येत असतानाही मोठ्या हिमतीने मुलासह स्वतःला तब्बल 16 वर्षे मुघलांच्या काळ्या छायेत एकदाही न रडता, मोठ्या धीराने, संयमाने आणि इतका मोठा काळ हिमतीने लढवणाऱ्या येसूबाईंसारख्या व्हा.. बाकी आयुष्यात हाय काय आणि नाय काय.. सगळं आपल्याच हातात आहे.. सख्यानो.. तुमची मैत्रीण…..गीतांजली गरड -मुळीक, तहसीलदार

Previous articleनांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा महिलांचे साखळी उपोषण       
Next articleमराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या नांदेडमध्ये भव्य सभा       
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here