Home नांदेड मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या नांदेडमध्ये भव्य सभा     ...

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या नांदेडमध्ये भव्य सभा       

45
0

आशाताई बच्छाव

IMG-20230930-WA0067.jpg

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची उद्या नांदेडमध्ये भव्य सभा                                 नांदेड,(ब्युरो चीफ संजय कोकेंवार)- दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नांदेड येथील नवा मोंढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर जरांगे पाटील यांची भव्य सभा होणार आहे.मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन या समाजाच्या ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथील उपोषणकरते मनोज जरांगे पाटील यांनी नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत.मराठा आरक्षणाचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असताना सरकारने या प्रश्नावर योग्य तोडगा काढील की नाही?याची शाश्वती नसल्याने मराठा समाज बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रात आता एकवटला असून या मराठ्यांचा सरकारने अता अंत पाहू नये.नाहीतर महाराष्ट्रभर यांचा उद्रेक होईल.असा सल्लाच मराठा बांधवांनी सरकारला दिला गेला आहे.या आधीचे सरकारने वेळोवेळी फसवे आरक्षण देऊन समाजाची एक प्रकारची फसवणूकच केली गेली होती.त्यामुळे मागच्या सारखेच आताही होऊ नये यासाठी समाजातील अभ्यासू कार्यकर्त्यास समाज बांधव सरकारच्या प्रत्येक बाबीकडे बारकाईने लक्ष देत आहेत.मनोज जरांगे पाटील यांनी हिमायतनगर मधील आत्महत्या केलेल्या सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत.त्यानंतर नांदेडमध्ये ते सभा घेणार असून,नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी या सभेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे “अभी नही तो कभी नही” असे आव्हानच सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous articleकायम शून्यात यायची तयारी ठेवा तहसीलदार गीतांजली गरड -मुळीक यांनी लिहिलेला लेख. … …
Next articleनांदगांव तालुक्यातील हिसवऴ बुर्द, येथील शिक्षक अपघातात ठार।     
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here