Home अमरावती अमरावती जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात.

अमरावती जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात.

36
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230929-042935_WhatsApp.jpg

अमरावती जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात.
——————————-
दैनिक यूवा मराठा वृत्तसेवा
पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर
अमरावती.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. याच मागणीसाठी चौंडी येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देत, अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी परिसरात भंडारा उधळण्यात आला; तसेच कपाळावर भंडारा लावून धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवुन आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले. धनगर समाजाच्या समावेश अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे ७६ वर्षापासून धनगर बांधवांना आपल्या हक्कावर पाणी सोडावे लागल्याचे धनगर शिष्टमंडळाचे म्हणणे आहे. धनगर बांधवांनी अनेक वेळा निवेदन व आंदोलन करूनही शासनाने त्याची दखल घेतलेली नाही.२०१४च्या निवडणूक मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ते सत्तेत आल्यावर पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे धनगर समाजाने त्यांना मदत केले; परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर एकदाही धनगर त्यांनी मांडला नसल्याचे धनगर समाजाचे म्हणणे आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीचा प्रश्न आता चिघळला आहे. राज्य व केंद्र सरकारने धनगरांच्या सहनशीलतेचाअंत पाहू नये. निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी धनगर समाजाला आरक्षण घोषित करा, लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरकू देणार नाही, असा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. आरक्षणाची लढाई ही स्वातंत्र्य धनगर समाजाची आहे. समित्या व बैठकीच्या भूलथापांना आता धनगर समाज भीक घालणार नाही, असा इशाराही यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी ऑड. दिलीप येळतकर,ऑड. अचल कोल्हे, विनय पुंनसे, ढोमणे, अशोक ईसळ, डॉ. बाबुराव नवले, भास्कर पुनसे, अशोक लव्हाळे, जानराव घटारे, मनोहर पुंनसे, अशोक लव्हाळे आदी समाज बांधव सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here