Home नांदेड गटविकास अधिकारी भालके यांनी मुखेड तालुक्यातील जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण केले –...

गटविकास अधिकारी भालके यांनी मुखेड तालुक्यातील जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण केले – अमोल वाकोडे

178
0

राजेंद्र पाटील राऊत

गटविकास अधिकारी भालके यांनी मुखेड तालुक्यातील जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण केले – अमोल वाकोडे

गट विकास अधिकारी टी.के भालके यांचा त्यांच्या वाढदिवसानिमीत्त ग्रामपंचायत ग्रामरोजगारसेवक संघर्ष समिती मुखेडच्या वतीने सत्कार संपन्न
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड शहर प्रतिनिधी

मुखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री टी.के भालके यांचा मुखेड पंचायत समिती येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत ग्रामरोजगारसेवक संघर्ष समिती मुखेडच्या वतीने भारत नाईक,आनंदराव गुट्टे, दिलीप चव्हाण,सुधाकर राठोड, बाळू करडखेले, मारोती पाटील टेकाळे,जोंधळे साहेब, तरटे सर खंडगावकर,यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामरोजगारसेवक बांधव उपस्थित होते. त्यावेळी ग्रामपंचायत ग्रामरोजगारसेवक संघर्ष समितीचे अमोल वाकोडे यांच्याकडून तत्त्वदर्शी सद्गुरु रामपालजी महाराज यांचे जगण्याचा मार्ग हे पुस्तक माननीय गटविकास अधिकारी श्री.भालके साहेब यांना भेट देण्यात आली. महाराष्ट्रात प्रशासकीय सेवेत कामकाज करीत असताना अनेक सनदी अधिकाऱ्यांनी अलोकिक स्वरूपाचे कामकाज केले आहे.आपल्या दैदिप्यमान कामगिरीच्या जोरावर नांदेड जिल्ह्यातील मुखेड पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री भालके यांनी आपल्या कार्यातून जनमानसात, जनमनात आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे.सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवित असतांना गटविकास अधिकारी श्री भालके साहेब यांनी सामाजिक प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.लोकांच्या सेवेसाठी ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवित असतांना गटविकास अधिकारी भालके यांनी मुखेड तालुक्यातील जनतेमध्ये आदराचे स्थान निर्माण केलेअसून, समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे काम केले आहे. गटविकास अधिकारी भालके यांनी पंचायत समिती मुखेड येथे गटविकास अधिकारी पदावर रुजू झाल्यापासून पंचायत समिती कार्यालयातील कामकाजामध्ये सुधारणा घडवून आणली आहे. पंचायत समिती मुखेड कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांमध्ये कामकाजासंबंधी शिस्त लावण्याचे काम गटविकास अधिकारी साहेब यांनी केले आहे. पंचायत समितीमध्ये सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना त्यांनी शिस्तबद्ध सूचना दिल्या असून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी करण्याचे आदेश दिले आहे. गटविकास अधिकारी साहेब यांच्या ग्रामीण भागातील जनतेशी असलेली जवळीता त्यामुळे आणि कामकाजातील शिस्तबद्ध असल्यामुळे कटू कसा अधिकारी साहेब यांचे नाव संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आदराने घेतले जाते.अशा या कर्तृत्वान आपल्यात कर्तव्यावर दक्ष राहून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देणारे गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेड श्री भालके यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्राम रोजगारसेवक संघर्ष समिती महाराष्ट्रच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देवून त्यांना पुढील कार्यास अशीच आपल्या हातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्यासाठी सेवा घडत राहो.आणि आपण घालून दिलेला आदर्श आपले मार्गदर्शन आमच्या ग्रामरोजगार सेवक बांधवांना भविष्यातील दैनंदिन जीवनात चालना देणारा असून आपल्याकडून आम्हा सर्वांना मिळालेली आमच्या जीवनात पावलोपावली उपयुक्त ठरणारे शिदोरी आहे.साहेब आपण आपल्या मनीआमच्या प्रती सामान्य माणसाबद्दलची कर्मचाऱ्या बद्दलची व रोजगार सेवकांनी बाबतच्या बद्दलची आदर भावना प्रेम जिव्हाळा आपल्या मनामध्ये आहे. ते मुखेड तालुका कधीही विसरू शकत नाही. आपण आपल्या कर्तव्यावर राहून करत असलेल्या कार्याला आमच्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ग्रामरोजगारसेवक संघर्ष समिती व महाराष्ट्रातील ग्रामरोजगारसेवक व मुखेड तालुका ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांच्या वतीने शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त जाती जमाती नांदेड चे जिल्हाअध्यक्ष अमोल वाकोडे यांनी आपले भावोउद्गार काढले.

Previous articleचांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी तब्बल सव्वा सहा लाख रुपये वर्गणी जमा केली.
Next articleकोविशिल्ड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here