Home अमरावती विभाजानानांतर शरद पवार गटाचा 3 आक्टोंबर ला अमरावती पहिला कार्यक्रम: सांस्कृतिक भवन...

विभाजानानांतर शरद पवार गटाचा 3 आक्टोंबर ला अमरावती पहिला कार्यक्रम: सांस्कृतिक भवन सुप्रिया सुळेची सभा.

117

आशाताई बच्छाव

Screenshot_20230929-042942_WhatsApp.jpg

विभाजानानांतर शरद पवार गटाचा 3 आक्टोंबर ला अमरावती पहिला कार्यक्रम: सांस्कृतिक भवन सुप्रिया सुळेची सभा.
—————————-
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी.एन.देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
विभाजानानांतर खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पहिला मेळावा आगामी मंगळवार ३ ऑक्टोंबर ला होत असून त्याला खासदार सुप्रियाताई सुळे संबोधित करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विभागांना नंतर शरद पवार गटाचा हा पहिला कार्यक्रम असून तो अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात होईल. अशी माहिती महानगर अध्यक्ष हेमंत पवार यांनी आज माहिती दिली. दुपारी ३ वाजता आयोजित या मेळाव्यासाठी अमरावतीत येणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे या दिवशी इतर काही नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असून सकाळी विदर्भाचे खुर्द असलेले अमरावती येथील आई अंबा देवीची आरती सुद्धा करणार आहेत. याशिवाय जिल्हा उद्योग कार्यालयाच्या समोर नव्याने तयार करण्यात आलेल्या अमरावतीच्या राष्ट्रवादी भवनाचे उद्घाटन हे त्यांच्या हस्ते करण्यात येईल. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नंतर शहरात आमदार रोहित पवार यांचीही सभा होणार असून त्यानंतर पुढच्या महिन्यात दस्तूर खुद्द पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अमरावती येथील अशीही यावेळी सांगण्यात आले. शरद पवार आणि अजित पवार अशा दोन पवारांच्या नेतृत्वात गेल्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विभागणी झाली. त्या विभागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे अलीकडेच अमरावतीत येऊन गेले. त्यांच्या पक्षाचा मेळा सुद्धा सांस्कृतिक भावना झाला होता. प्रदेश उपाध्यक्ष संजय घोडके यांच्या नियोजनातील तो मेळावा विभागीय पातळीवर होता शिवा त्याला चक्कर गर्दी ही झाली होती. त्याहून जास्त गर्दी सुप्रिया ताईच्या उपस्थितीतील मेळाव्याला होईल, असा आहे जगाचा आशीवाद आहे. पत्रकार परिषद ला ज्येष्ठ नेते तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, विधानसभेचे माजी उपसभापती प्रा. शरद तसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वराळे इतर पदाधिकारी सुरेश कडू, गणेश राय, भास्करराव ठाकरे, महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष संगीता ठाकरे, रा.यु.काँग्रेसचे गणेश आडतीया,ऑड. धनंजय तोटे, ऑड. संजय बाबरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleअमरावती जिल्हा कचेरीवर उधळला भंडारा, सकल धनगर समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात.
Next articleस्लग नांदगाव शहरातील गणेश नगर भागातील अर्थवने बनवले श्रीराम मंदिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.