Home अमरावती नांदगांव खंडेश्वर येथे स्वच्छता रन

नांदगांव खंडेश्वर येथे स्वच्छता रन

70
0

आशाताई बच्छाव

IMG-20230925-WA0095.jpg

नांदगांव खंडेश्वर येथे स्वच्छता रन
गजानन जिरापूरे
जिल्हा प्रतिनिधी
अमरावती, : भारत मिशन अंतर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रम दि. 2 ऑक्टोंबरपर्यंत पंधरवाडा स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नांदगांव खंडेश्वर येथे रविवार दि. 24 रोजी पंचायत समितीचे वतीने स्वच्छता रनचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पंचायत समितीचे अधिकारी, महिला बचत गट, आशा वर्कर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला होता.

 

गावांच्या शाश्वत विकासामध्ये आरोग्य, शिक्षण व स्वच्छता हे महत्वाचे घटक असून स्वच्छता हि सेवा अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबतचे महत्व पटवून देण्यात येत आहे. यासाठी विविध उपक्रमही राबवित असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी दिली. स्वच्छता रन यशस्वीतेकरीता स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी सुनिल खेडीकर, विस्तार अधिकारी, दांडगे अभियंता, रश्मी कुंभलकर, संदीप देशमुख, संदीप गुल्हाने, दतप्रभू पुसदकर, शेख साबीर, निलेश खडसे, विजय अळणे, मनिष मदनकर, रितेश कोठेकार, पुरुषोतम डोफे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleगिरणा धरणातून MIDC साठी 1500 क्यूसेस पाणी विसर्ग
Next articleउघड्यावर साठविलेल्या धानाच्या विक्री रद्द करा : जयश्री वेळदा यांची मागणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here