Home मुंबई आयफोन १५’च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; परराज्यांतील नागरिक मुंबईत दाखल..

आयफोन १५’च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; परराज्यांतील नागरिक मुंबईत दाखल..

87
0

आशाताई बच्छाव

IMG-20230924-WA0027.jpg

आयफोन १५’च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; परराज्यांतील नागरिक मुंबईत दाखल..

मुंबई : (प्रतिनिधी विजय पवार ) आयफोनचे आकर्षण लक्षात घेऊन भारतात शुक्रवारी ‘अ‍ॅपल आयफोन १५’ या मालिकेतील मोबाइल विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. कंपनीच्या बीकेसी येथील दुकानाबाहेर या मोबाइलच्या खरेदीसाठी अ‍ॅपलप्रेमींची झुंबड उडाली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परराज्यांतूनही ग्राहक खरेदीसाठी मुंबईत आले होते.भारतात विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या ‘आयफोन १५’च्या मालिकेमध्ये चार मॉडेलचा समावेश आहे. ‘आयफोन १५’, ‘आयफोन १५ प्लस’, ‘आयफोन १५ प्रो’ आणि ‘आयफोन १५ प्रो मॅक्स’ यांचा त्यामध्ये समावेश आहे. अ‍ॅपल कंपनीने गुलाबी, पिवळय़ा, हिरव्या, निळय़ा आणि काळय़ा रंगात हे मोबाइल विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.आयफोन १५’ची किंमत ७९ हजारांपासून १ लाख ५९ हजार ९०० रुपयांदरम्यान आहे. ग्राहकांना ‘आयफोन १५ प्लस’साठी ८९ हजार रुपये, ‘आयफोन १५ प्रो’साठी १ लाख ३४ हजार ९०० रुपये द्यावे लागणार आहेत. ‘आयफोन प्रो’ आणि ‘आयफोन १५ प्रो मॅक्स’ अ‍ॅपलचे आतापर्यंतचे वजनाने सर्वात हलके ‘मॉडेल’ आहेत. ‘आयफोन १५’ सीरिजचे हे फोन १२८ जीबी, १५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टीबी साठवण क्षमतेत उपलब्ध आहेत. बीकेसीच्या दुकानात अहमदाबादवरून खास अ‍ॅपल मोबाइलच्या खरेदीसाठी मुंबईला आलेला तरुण चक्क सतरा तासांपासून रांगेत उभा होता. इतकेच नव्हे, तर एका तरुणाने आयफोन १५ खरेदीसाठी बंगळूरुवरून विमानाने प्रवास करत मुंबई गाठली. तसेच अभिनेता रणवीर सिंग यानेही शुक्रवारी बीकेसीतील दुकानाला भेट दिली.

Previous articleवाहतूक सुरक्षा जागृती काळाची गरज–साईनाथ वीर
Next articleविठ्ठल रखुमाई ग्रुप च्या सौ शारदा ताई गवळीं ची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला सरचिटणीसपदी नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here