Home अमरावती विद्यापीठ सलग्न १६७ महाविद्यालयाचे”नॅक” मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शिक्षणिक भवितत्त्व धोक्याचे संकेत कुल...

विद्यापीठ सलग्न १६७ महाविद्यालयाचे”नॅक” मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शिक्षणिक भवितत्त्व धोक्याचे संकेत कुल सचिवांचे पत्र.

51
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20230923-200132_WhatsApp.jpg

विद्यापीठ सलग्न १६७ महाविद्यालयाचे”नॅक”
मूल्यांकन नाही; विद्यार्थ्यांचे शिक्षणिक भवितत्त्व धोक्याचे संकेत कुल सचिवांचे पत्र.
—————–_———
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलग्न १६७ अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅकमूल्यांकन व पुनर्मुल्यांकन सादर केले नाही. अशा महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४च्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमांचे प्रवेश त्यांच्या जबाबदारी घ्यावे, अशा आशयाचे पत्र प्राचार्यांना कुलसचिवांनि पाठवले आहे.त्यामुळे नॅक नाही तर प्रवेश नाही याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची दाट शक्यता आहे. फुल सचिव डॉक्टर तुषार देशमुख यांनी २० सप्टेंबर रोजी अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालयाचे संस्थासंचालक, प्राचार्याच्या नावे पत्र निर्गमित करून नॅक मुल्यांकन नसल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश आपल्या जबाबदारीवर करण्याबाबतचे कळविले आहे.विधापीठ ६जुन२०२३ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या सभेतील निर्णयानुसार शासनाच्या पुढील आदेश पर्यंत महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या प्रवेशावर विद्यापीठ कडून कोणते निर्बंध लावण्यात येणार नाही. तथापि महाविद्यालयांनी प्रथम वर्षाचे प्रवेश आपल्या जबाबदारीवर करावे, असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे येत्या काळात शासनाकडून नॅक ‘नसलेल्या महाविद्यालयाचे प्रवेश रद्द करण्याबाबत भूमिका घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितत्त्व धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे. विद्यालयाचे प्राचार्य, संस्था चालकांना शासन निर्देशानुसार नॅक मुल्यांकन साठी वारंवार पत्रविहार केला आहे. मात्र अद्यापही चार अनुदानित, १६३ अशासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालयांनी नॅक मुल्यांकन अहवाल सादर केला नाही. याविषयी प्राचार्याकडून खुलासा मागविला जाणार आहे. असे डॉ. संदीप वाघुळे प्रमुख नॅक मुल्यांकन व मानांकन विभाग अमरावती विद्यापीठ यांनी सांगितले आहे.

Previous articleबॅड टच’करणाऱ्या त्या शिक्षकांच्या दोन रात्री कोठडी, पालकांसह राजकीय पक्षांची त्या शाळेवर धाव.
Next articleश्री क्षेत्र हिरापुर (दरसवाडी) येथे अखंड हरिनाम सप्ताह एकनाथ भागवत पारायण सोहळ्यास प्रारंभ —
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here